‘इंटर्नशाला’ या पोर्टलमध्ये सॉफ्टवेअर मार्केटिंग, मॅनेजमेंट, अकाऊंटिंग, एन्टरप्रिन्युअरशिप यांसारख्या विविध विषयांवर विद्यार्थ्यांकरिता इंटर्नशिप उपलब्ध आहेत. द्वितीय, तृतीय व चतुर्थ वर्षांचे विद्यार्थी यासाठी चाचणीद्वारे पात्र ठरतात. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या विषयात नवनवीन कौशल्याचे प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रणित भिसे, मदीहा फातेमा, चेतन आडे, साक्षी पांडे, अनुप मिरकुटे, प्रतीक सावळे, वैष्णवी नारखेडे, अविनाश खरे, अश्विनी संबापुरे, स्वप्नील सुरुशे तसेच माजी विद्यार्थी युगा सावजी, शार्दूल भराड, अक्षय खोब्रागडे या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. या यशाबद्द्ल संस्थेचे अध्यक्ष सिद्धिविनायक बोंद्रे, सचिव राहुल बोंद्रे, उपाध्यक्ष डॉ.व्ही.आर.यादव, विश्वस्त नानासाहेब सराफ, सलीमोद्दीन काझी, सिध्देश्वर वानेरे, आत्माराम देशमाने, प्राचार्य डॉ. अरुण नन्हई तसेच प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
अनुराधा अभियांत्रिकीच्या २४ विद्यार्थ्यांची ‘इंटर्नशाला’मध्ये निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 4:38 AM