अन्यायाची चाैकशी करण्याची मागणी
बुलडाणा : मेहकर तालुक्यातील लाेणी येथील सतीश मधुकर देशमुख यांनी पाेलीस अधीक्षकांना निवेदन देऊन चुकीच्या पद्धतीने आपल्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याचा आराेप केला आहे.याप्रकरणाची चाैकशी करून न्याय देण्याची मागणी देशमुख यांनी निवेदनात केली आहे.
हजरत भोले शाह बाबांना चढविली चादर
देऊळगाव राजा : कोरोनाचे संकट महाराष्ट्रात पुन्हा एकदा गडद होऊ लागले असताना राज्याच्या मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांनाही कोरोनाने गाठले आहे. बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिगंणे यांनाही कोरोनाची लागण झाली होती. डाॅ.शिंगणे हे काेराेनातून बरे झाल्याने देऊळगाव राजा शहरातील त्यांच्या समर्थकांनी हजरत भोले शाह बाबांच्या चरणी चादर अर्पण केली. यावेळी राष्ट्रवादीचे युवानेते अरविंद खांडेभराड, युवक उपाध्यक्ष समीर खान, सैय्यद जहुर, अहमद खाॅन उपस्थित होते.
आगग्रस्तांना जीवनाश्यक वस्तूंची भेट
बिबी : लाेणार तालुक्यातील हत्ता येथील आगग्रस्तांना मानवता जाेपासत मानवता फाऊंडेशनच्या विश्वस्तानी मदतीचा हात देवून जीवनाश्यक वस्तूंची भेट दिली. हत्ता येथे २३ फेब्रुवारी राेजी घराला आग लागून ३ लाख ९८ हजारांचे नुकसान झाले हाेते. या आगीत जीवनाश्यक वस्तू, राेख रक्क्म जळून खाक झाली. मदत वाटप करताना फाऊंडेशनचे अरविंद चव्हाण, अनिल राठाेड, रितेश चव्हाण आदी उपस्थित हाेते.
परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थ्यांना दिलासा
धाड : अभियांत्रिकीच्या परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. अभियांत्रिकीची प्रवेशपरीक्षा उशिरा सुरू झाली आहे. त्यातच महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थी आधीच संकटात सापडले आहेत. परीक्षेचे वेळापत्रकही जाहीर झाले हाेते. त्यामुळे, विद्यार्थ्यांची चिंता वाढली हाेती.
वाळू उपसा नियंत्रणासाठी ग्रामदक्षता समिती
बुलडाणा : शासन निर्णयान्वये वाळू निर्गती धोरण निश्चित करण्यात आले असून ग्रामपंचायतस्तरावर ग्रामदक्षता समिती गठीत करण्याबाबत निर्देश दिले आहेत. ज्या गावामध्ये वाळू गट किंवा वाळूसाठे असतील, अशा ग्रामपंचायतीमध्ये ग्रामदक्षता समितीची स्थापना करण्यात येत आहे. या समितीचे अध्यक्ष सरपंच राहणार असून तलाठी सदस्य सचिव असणार आहे.
धाड ते दाताळा रस्त्याची दुरवस्था
धाड - जामठी, गिरडामार्गे दाताळा रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. जागोजागी रस्त्यावरील डांबर उखडले आहे. त्यामुळे वाहनधारकांना वाहने चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. दळणवळण ठप्प झाले असून पर्यटन विकासदेखील थांबला आहे.