बुलडाणा : शिवरत्न शिवा काशिद स्मारक समितीची २७ मार्च रोजी निवड करण्यात आली. या समितीच्या अध्यक्षपदी कुणाल संजय गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे. आमदार संजय गायकवाड यांच्या प्रयत्नातून शिवरत्न शिवा काशिद उद्यान, मलकापूर रोड, बुलडाणा याठिकाणी अष्टधातुंचा पुतळा उभारण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवरत्न शिवा काशिद स्मारक समितीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी अध्यक्ष म्हणून कुणाल गायकवाड, कार्याध्यक्ष गजाननभाऊ मोतेकर, सचिव गोपाल वाघमारे, कोषाध्यक्ष मंगेश बिडवे, संघटक पांडुरंग ओरपे, उपाध्यक्ष दीपक जाधव, गजानन झगरे, नीलेश अरविंद शिंदे, राजू पांडे, विरेंद्र अपार, प्रकाश वाघ, रमेश वखरे. सहसचिव लखन जाधव, कैलास काशीकर, श्रीकांत खिर्डेकर, रवींद्र सूर्यवंशी, उमेश वाघमारे, सहकोषाध्यक्ष दिलीप झगरे, सुभाष रायकर, अनिल वाघमारे, नरेंद्र भंडारी यांची निवड करण्यात आली आहे.
शिवा काशिद स्मारक समितीची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2021 4:35 AM