- नीलेश जोशीलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : स्वयंशिस्त हाच कोरोना लढ्यातील मुलमंत्र असल्याचे जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी स्पष्ट केले आहे. कोरोना संसर्ग टाळण्याच्या दृष्टीने आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि साथरोग प्रतिबंध कायदा लागू करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्याकडे जवळपास सर्वच अधिकार एकवटल्या गेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी संवाद साधला असता ही बाब त्यांनी स्पष्ट केली.
कोरोना संसर्ग टाळण्यासाठी जिल्ह्यात काय उपाययोजना केल्या आहेत.?यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि साथरोग प्रतिबंधक कायदा लागू करण्यात आला आहे. ३१ मार्च पर्र्यंत जिल्ह्याती सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे निर्देश दिले गेले आहे. जीवनावश्यक वस्तू व मेडीकल स्टोअर्स तेवढे वगळे आहे.
गर्दीची ठिकाणे टाळण्यासाठी आदेश दिले आहेत काय?गर्दीची ठिकाणे टाळण्यासाठी ‘नो गॅदरींग’च्या सुचना दिल्या आहेत. जिल्ह्यातील आठवडी बाजार आणि सर्व आस्थापना ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहे. केंद्र सरकारने दिलेल्या सुचना व निर्देशांच योग्य व गुणात्मक पद्धतीने जिल्ह्यात पालन करण्यात येत आहे.
आरोग्य विषयक आपली सज्जता कितपत आहे?कोरोना संसर्ग टाळण्याच्या दृष्टीने आपण सजग आहोत. जिल्ह्यात शेगाव, खामगाव आणि बुलडाणा येथे तीन आयसोलेशन कक्ष उभारण्यात आले असून १०० बेडचा क्वारंटीन कक्ष ही बुलडाण्यात उपलब्ध आहे. कोरोना टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास प्राधान्य दिलेले आहे.
कोरोना संसर्गाबाबत जिल्ह्यातील स्थिती कितपत सुरक्षीत आहे.?सुदैवाने जिल्ह्यात अद्याप एकही कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण आढळलेला नाही. संशयीत सहा जणांचे नुमने आपण विषाणू तपासणी प्रयोग शाळेस पाठविले होते. त्याचे नमुनेही निगेटीव्ह आहेत. स्वयंशिस्त व प्रतिबंध हाच कोरोना दूर ठेवण्याचा उपाय आहे.
लग्न समारंभाबाबत काय सुचना आहेत?गर्दी टाळण्यासाठी लग्न समारंभ पुढे ढकलावेत किंवा अगदी साध्या पद्धतीने लग्न उरकावे याबाबत आपण आवाहन केले आहे, त्याबाबत निर्देशही दिले आहे. सोबतच विवाह हे आटोपशीरपणे व्हावे, यासाठी रजिस्टर पद्धतीने विवाह करण्यास प्राधान्य दिले जावे. त्यादृष्टीने प्रशासकीय पातळीवर यंत्रणेला सज्जतेचे आदेश दिले आहे. तशा उपाययोजनाही आपण करत आहोत. बुलडाण्यातील एका माजी आमदाराच्या कन्येचा विवाहही अगदी साध्या पद्धतीने करण्यात आला. त्यांनी घेतलेला हा निर्णय कौतुकास्पद आहे. धार्मिक स्थळी गर्दी टाळण्याच्या सुचना आहेत.
गर्दीची ठिकाणे टाळण्याच्या नागरिकांना सुचना दिल्या आहेत.स्टेडीयमही बंद करण्याच्या आपल्या हालचाली आहेत. जनमानसात याविषयी जागृती व्हावी, यादृष्टीकोणातून जिल्हास्तरावरून अपेक्षीत असलेल्या बाबी पूर्ण केल्या. परदेशतून आलेल्या नागरिकांवर वॉच आहे. १२ विदेशी नागरिकांना होम क्वारंटीनमधून सुटीही देण्यात आली आहे.- सुमन चंद्रा