लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठव्दारे संचालित मॉडेल डिग्री महाविद्यालय, बुलडाणा व साहित्य अकादमी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ११ आॅक्टोबर रोजी ‘भक्ती संप्रदायाचा मराठी साहित्यावर प्रभाव’ या विषयावर एक दिवसीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.चर्चासत्राचे अध्यक्षस्थान सुप्रसिद्ध साहित्यिक वसंत आबाजी डहाके भुषविणार आहेत. यावेळी बारोबासकार डॉ. सदानंद देशमुख बीजभाषण करणार आहेत. कार्यक्रमाविषयीची रूपरेषा कृष्णा किंबहुने हे मांडणार आहेत. याप्रसंगी मान्यवरांचे भाषण होणार आहे. सकाळी १०.३० वाजता कार्यक्रमाची सुरूवात होणार असून, दिवसभर सत्र चालणार आहे. उद्घाटनानंतर संत साहित्याचे अभ्यासक सतीश बडवे यांच्या अध्यक्षतेखाली भक्ती संप्रदायाचा मराठी साहित्यावर प्रभाव यावर रविंद्र इंगळे चावरेकर आणि हेमंत खडके निबंध वाचन करणार आहेत.
मॉडेल डिग्री महाविद्यालयात साहित्य अकादमीच्यावतीने चर्चासत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2017 8:15 PM
बुलडाणा : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठव्दारे संचालित मॉडेल डिग्री महाविद्यालय, बुलडाणा व साहित्य अकादमी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ११ आॅक्टोबर रोजी ‘भक्ती संप्रदायाचा मराठी साहित्यावर प्रभाव’ या विषयावर एक दिवसीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे ‘भक्ती संप्रदायाचा मराठी साहित्यावर प्रभाव’ या विषयावर चर्चासत्रअध्यक्षस्थान भुषविणार सुप्रसिद्ध साहित्यिक वसंत आबाजी डहाके