कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुनील पांडे व प्रमुख वक्त्या म्हणून अमरावती शहरातील एपीआय प्रशाली काळे होत्या. महिलांची सुरक्षा व पोलिसांची भूमिका या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. त्यांनी अतिशय वास्तव भूमिका मांडली. महाविद्यालयात, नोकरीच्या ठिकाणी, कार्यालयात अनेक ठिकाणी महिला अत्याचाराला बळी पडू शकतात, त्याकरिता अनेक कायदे महिलांसाठी आहेत, याची जाणीव त्यांनी मुलींना करून दिली. आयुष्यात यश मिळविण्यासाठी खडतर परिश्रम घ्यावे लागतात, असे मतही काळे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. नंदा मास्कर यांनी केले. त्यांनी आधुनिकीकरण व जागतिकीकरणात नीतिमूल्याची घसरण होत असल्यामुळे महिलांच्या सुरक्षेसाठी व कायद्याच्या जाणिवेसाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करावे लागतात व त्याचाच भाग म्हणून महिला सबलीकरणाच्या दृष्टीने या ऑनलाइन वेबिनारचे आयोजन केले आहे, असे मत व्यक्त केले. डॉ. सुनील मामलकर, प्रा. विजय धुमाळ, प्रा. अविनाश मेहेरकर, प्रा. पुरुषोत्तम चाटे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन डॉ. सुप्रिया बेहरे यांनी केले. तांत्रिक व्यवस्था प्रा. नागेश गट्टूवार, प्रा. प्रतीक गायकी, प्रा. नीलेश राहाटे, प्रा. भास्करराव भिसे, प्रा. दादा मनगटे यांनी पहिली.
महिला सुरक्षा व पोलिसांची भूमिका यावर चर्चासत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 4:33 AM