शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

पैसे देऊन काेराेनाची लस घेण्यातही ज्येष्ठ नागरिक पुढेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 4:34 AM

बुलडाणा : काेराेना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्यात दुर्धर आजारी व ६० वर्षांपेक्षा जास्त असलेल्या ज्येष्ठांचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. ...

बुलडाणा : काेराेना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्यात दुर्धर आजारी व ६० वर्षांपेक्षा जास्त असलेल्या ज्येष्ठांचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यात ३ मार्चपासून हे लसीकरण सुरू करण्यात आले असून ज्येष्ठ नागरिक लस घेण्यात पुढेच आहेत.

केंद्र सरकारने काेविशिल्ड लसीला मान्यता दिल्यानंतर जिल्ह्यात लसीकरण सुरू झाले आहे. पहिल्या टप्यात आराेग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. त्यानंतर फ्रंटलाइन वर्कर यांना लस देण्यात आली. १ मार्चपासून जिल्हाभरात ज्येष्ठ नागरिकांसह दुर्धर आजार असलेल्या रुग्णांना काेराेना लस देण्यात येत आहे. त्यासाठी ऑनलाइन नाेंदणी करावी लागते. ग्रामीण रुग्णालये, प्राथिमक आराेग्य केंद्रामध्ये ही लस माेफत आहे. खासगी रुग्णालयांमध्ये २५० रुपयांप्रमाणे ही लस देण्यात येत आहे. पैसे माेजूनही ज्येष्ठ नागिरकांचा काेराेना लस घेण्याकडे कल वाढला आहे. जिल्हाभरात आतापर्यंत २ हजार ३३३ जणांनी खासगी रुग्णालयांमध्ये लस घेतली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात शासकीय लसीकरण केंद्रात २६ हजार ३१३ जणांनी काेराेना लस घेतली. यामध्ये ४५ ते ५९ वयोगटातील १हजार ४८८ तर ६० वर्षावरील ४ हजार ९०० जणांचा समावेश आहे.

ज्येष्ठ नागरिकांची संख्या सर्वाधिक

जिल्हाभरात विविध केंद्रावर काेराेना लसीकरण सुरू करण्यात आले आहे. आता सरकारी केंद्रावर २६ हजार ३१३ जणांनी काेराेनाची लस घेतली आहे. यामध्ये सर्वाधिक संख्या ही ६० वर्षावरील लाेकांची आहे. त्यामुळे, इतर वयाेगटातील लाेकांपेक्षा लस घेणाऱ्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या माेठी आहे. जिल्ह्यातील जवळपास ५ हजार ज्येष्ठांनी आतापयर्यंत लस घेतली आहे. तसेच पैसे देउनही २ हजार ३३३ जणांनी लस घेतली आहे.

महिलांनीही घेतली लस

जागतिक महिला दिनी जिल्ह्यातील १३ लसीकरण केंद्रावर महिलांसाठी काेराेना लसीकरण केंद्राची व्यवस्था करण्यात आली हाेती. त्याला ज्येष्ठ महिलांसह दुर्धर आजार असलेल्या महिलांनीही चांगला प्रतिसाद दिला. दिवसभर या केंद्रावर लसीकरण करण्यात आले हाेते. तसेच आराेग्य विभागाने महिला दिनानिमित्त विशेष व्यवस्था केली हाेती.

मी लस घेतली, तुम्ही

काेराेना संसर्गाचा वाढता धाेका पाहता सर्वांनी लस घेण्याची गरज आहे. लस घेउन स्वत:ला सुरक्षीत करा आणि इतरांनाही सुरक्षीत ठेवा. लस घेतल्यानंतर मला कुठलाही त्रास हाेत नाही. त्यामुळे,ही लस पूर्णता सुरक्षीत असल्याने सर्वांनीच लस घ्यावी.

प्रा.डाॅ.श्रीराम येरणकर, बुलडाणा

काेराेनाचा प्रभाव कमी करण्यासाठी सर्व ज्येष्ठ नागरिकांनी काेराेना लस घेण्याची गरज आहे. या लसीपासुन मला कुठलाही त्रास झाला नाही. ज्येष्ठ नागरिकांना काेराेनाचा धाेका पाहता सर्वांनीच लस घेण्याची गरज आहे.

वनिता नरहरी देशमुख, बुलडाणा