ब्रह्मनंद जाधव बुलडाणा, दि. 0८- पोलीस विभागाने कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसह संवेदनशीलता जपत महिलांना सुरक्षा व्यवस्था पुरवली आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी जिल्हा स्तरावर तसेच पोलीस ठाणे पातळीवर महिला सुरक्षा समित्या स्थापन करण्यात आल्या असून, पोलिसांच्या विविध समित्यांमुळे जिल्ह्यातील महिलांना सुरक्षा मिळत आहे. जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीमुळे महिलांची सुरक्षा धोक्यात आली होती. सार्वजनिक ठिकाणी महिला निर्धास्तपणे जाऊ शकत नव्ह त्या; परंतू गेल्या काही वर्षात पोलीस विभागाने कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसह संवेदनशीलता जपत महिलांना सुरक्षा व्यवस्था पुरवली आहे. महिलांवरील अत्याचार थांबविण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. महिलांवर होणार्या अत्याचाराचा निपटारा होण्यासाठी सर्व आयुक्तालय व जिल्ह्यांमध्ये घटक प्रमुखांच्या नियंत्रणाखाली मु ख्यालयाच्या ठिकाणी महिला सहाय्य कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. हे महिला साहाय्य कक्ष महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी, त्या विभागातील अशासकीय संस्थाचीसुद्धा मदत घेतात. महिलांच्या सुरक्षेसाठी जिल्हा, आयुक्तालय पातळीवर तसेच पोलीस ठाणे पातळीवर महिला सुरक्षा समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. जिल्हा आयुक्तालय पातळीवर समिती, जिल्हा पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त किंवा पोलीस उपआयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत आहे. या समितीमध्ये महिला डॉक्टर्स, महिला वकील, प्राध्यापिका तसेच सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्याच प्रकारे पोलीस ठाणे पातळीवर महिला सुरक्षा समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. अशा समित्यांमार्फत विविध कायद्यांच्या माध्यमातून महिलांच्या न्याय हक्काचे रक्षण होत असल्याने महिला निर्धास्तपणे कुठेही जाऊ शकतात. जिल्ह्यात सुरक्षा समित्यांमुळे खर्या अर्थाने महिलांची सुरक्षा जपली जात आहे. हुंडा पद्धत नष्ट करण्यासाठी दक्षता समित्याहुंडा पद्धत नष्ट करण्यासाठी जिल्ह्यात दक्षता समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. महिला व बालविकास विभागाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये हुंडा प्रतिबंधक अधिकार्यांची नियुक्ती केली आहे. जिल्हा दक्षता समितीचे सदस्य असलेले पोलीस आयुक्त किंवा पोलीस अधीक्षक हे जिल्हा पातळीवर काम पाहतात. तसेच महिला सुरक्षा समितीचे सदस्य असलेले पोलीस निरीक्षक किंवा पोलीस अधीक्षक हे पोलीस ठाणे पातळीवर हुंडा प्रतिबंधक अधिकारी म्हणून नेमलेले आहेत.
संवेदनशीलता जपत महिलांना सुरक्षा!
By admin | Published: October 09, 2016 1:52 AM