गत काही दिवसापासून शहरांसह ग्रामीण भागात काेराेना रुग्णांची संख्या वाढत आहे़ वाढत्या रुग्ण संख्येमुळे काेविड केअर सेंटरवरील ताण वाढला आहे़ दिवसागणिक कोरोना बधितांचा आकडा आणि मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे़ अशा भयावह परिस्थिती मेहकर आणि शेगाव सारखे धाड भागातील खासगी व्यवस्थापनाच्या शाळा महाविद्यालय यांची संख्या १२ आहे़ परिसरातील दान दात्यांनी पुढाकार घेऊन ५० बेडचे क्वारंटाईन सेंटर सुरू करण्याची गरज आहे़ सोबतच धाड भागातील लोक प्रतिनिधींनी शासन स्तरावर प्रयत्न करून कोरोना लस उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे़ धाड परिसराला विदर्भ मराठवाड्यासह ५२ खेडे संलग्न आहेत़ येथे दैनंदिन कामांसाठी नियमित येणे जाणे असते परिसरातच जर कोविड सेंटर असले तर रूग्ण सोबत नातेवाईकांची ही हेळसांड थांबू शकते़ खासगी व्यवस्थापनाने कोविड सेंटर उभारण्याची अपेक्षा परिसरातील जनतेने केली आहे़
धाड परिसरात खासगी व्यवस्थापनाच्या अनेक इमारती आहेत़ आम्हाला अपेक्षा आहे़ या महामारीच्या काळात सामाजिक दातृत्व करण्यासाठी पुढे येईल
सिद्धार्थ जाधव, सामाजिक कार्यकर्ते डोमरूळ
महाराष्ट्र कोरोना या भयावह महामारी सामना करतोय़ . खासगी व्यवस्थापनाने समाजाच्या हितासाठी शाळा महाविद्यालय उघडली़ ते बंद असताना आतापर्यंत एकाने जरी आपल्या व्यवस्थापनेत क्वारंटाईन सेंटर उभारले तर रुग्णांना दिलासा मिळणार आहे़
अनिल फेपाळे, ग्रामस्थ रुईखेड (मयंबा)