लोकमत न्यूज नेटवर्कमोताळा : नांदुरा तालुक्यातील तांदूळवाडी येथील शालेय विद्यार्थ्यांनी गावाशेजारी असलेल्या चंद्रज्योती या झाडाच्या बिया खाल्ल्याने १५ ऑगस्ट रोजी विषबाधा झाली. या सातही विद्यार्थ्यांना मोताळा येथील डॉ. महाजन यांच्या रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.स्वातंत्रदिन असल्याने दुपारनंतर शाळेला सुट्टी होती. या सुट्टीच्या काळात काही विद्यार्थी गावाजवळीलच महादेवाच्या मंदिराजवळ सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गेले होते. या मंदिराशेजारीच जट्रोफाची काही झाडे आहेत. १२ वर्षाआतील या बालकांनाही झाडे विषारी असतात, याबाबत कल्पना नव्हती. त्यांनी या झाडाच्या बिया खाल्ल्यावर दुपारनंतर यातील ७ जणांना उलट्या व संडासचा त्रास जाणवू लागला. सदर प्रकार गावकर्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी या प्रकाराची सखोल चौकशी केल्यानंतर चंद्रज्योती या झाडाच्या बिया खाल्ल्याचे या विद्यार्थ्यांनी सांगितले. त्यांना ताबडतोब जवळच असलेल्या मोताळा येथील डॉ. महाजन यांच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या सातही विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे.
चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्याने सात बालकांना विषबाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 12:13 AM
लोकमत न्यूज नेटवर्कमोताळा : नांदुरा तालुक्यातील तांदूळवाडी येथील शालेय विद्यार्थ्यांनी गावाशेजारी असलेल्या चंद्रज्योती या झाडाच्या बिया खाल्ल्याने १५ ऑगस्ट रोजी विषबाधा झाली. या सातही विद्यार्थ्यांना मोताळा येथील डॉ. महाजन यांच्या रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.स्वातंत्रदिन असल्याने दुपारनंतर शाळेला सुट्टी होती. या सुट्टीच्या काळात काही विद्यार्थी ...
ठळक मुद्देनांदुरा तालुक्यातील तांदूळवाडी येथील घटनाविद्यार्थ्यांना खासगी रूग्णालयात हलविले, प्रकृती धोक्याबाहेर