बुलडाणा : आज सकाळपासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू असून नद्या नाल्यांना पूर आला आहे.या पावसामुळे खडकपूर्णा धरणाचे सात दरवाजे उघडले असून त्यातून ३५0 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दरम्यान नदीकाठच्या गावातील नागरीकांना सतर्क राहण्याचा ईशारा देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी कुरुंदकर यांनी दिली. तीन दिवसाच्या विश्रांतीनंतर आज ७ सप्टेंबर रोजी पावसाने परत सर्वत्र हजेरी लावली लावली. सकाळपासून बुलडाणा शहरांसह जिल्ह्यात कुठे जोरदार तर कुठे तुरळक पाऊस सुरू झाला होता. रात्री पावसाचा जोर वाढल्याने जनजीवन प्रभावित झाले. चिखली तालु क्यात सुध्दा सकाळी ११ वाजल्या पासुन जोरादार पाउस झाला. तालुक्यातील कोलारा, एकलारा, अचंरवाडी, मेरा बु., बेराळा, दहेगांव , बोरगांव काकडे सह सायंकाळपर्यंत पाऊस सुरू होता. तर बुलडाणा तालुक्यातील मोताळा येथे सकाळी ११ वाजे पासुन सायंकाळ पर्यंत जोरदार पाउस सुरू होता मोताळा परिसरातील कोथळी, बोराखेडी, डिडोला, तरोडा, चिंचपुर, रोहिणखेड, धामणगांव बढे सह परिसरात देखील जोरदार पाउस सुरू होता. देऊळगांव राजा तालुक्यात दमदार पाऊस झाल्याने खडकपुर्णा धरणाचे रात्री उशीरापर्यंत ७ दरवाजे उघडण्यात आले असल्याची माहिती तहसिलदार बुटले यांनी दिली.
खडकपूर्णाचे सात दरवाजे उघडल
By admin | Published: September 08, 2014 2:05 AM