लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर नेमण्यात आलेल्या बैठे पथकाने बुधवारी दुपारी बाळापूर नाक्यावर ७ लाखाची रोकड घेवून जाणारी कार पकडली. यावेळी चालकास कारसह ताब्यात घेण्यात आले. असून रोकड जप्त करून निवडणूक विभागाच्या स्वाधीन करण्यात आली. लोकसभा निवडणुकीदरम्यान गैरप्रकार रोखण्यासाठी निवडणूक विभागाने वेगवेगळी पथके नेमली असून या पथकांमार्फत शहरात येणाºया व जाणाºया वाहनांची कसुन तपासणी केली जात आहे. या तपासणीदरम्यान आज दुपारी बाळापूर नाक्यावर अकोलाकडून खामगावात येत असलेल्या इनोव्हा कार क्र.एमएच३० -एझेड-०६३४ ची तपासणी केली असता सदर कारमध्ये एका बॅगेत ६ लाख ९३ हजाराची रोकड आढळून आली. यावेळी तपासणी पथकाने चालक गगन रामपाल शर्मा रा.बाळापूर याला कारसह ताब्यात घेतले असून त्याच्या ताब्यातून सदर रोकड जप्त करण्यात आली. यानंतर स्टेट बँकेत जावून सदर रक्कमेची पडताळणी करण्यात आली व सदर रोकड निवडणूक विभागाच्या स्वाधीन करण्यात आली. (प्रतिनिधी)
वाहनातून सात लाख रुपये जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2019 6:39 PM