शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

सात प्रकल्प तुडूंब; बुलडाणा जिल्ह्याची पाण्याची चिंता मिटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 2:11 PM

पाणीटंचाईची जिल्ह्यातील समस्या निकाली निघाली असून पाणीपुरवठा योजना असलेल्या उद्भवांना बऱ्यापैकी पाणी उपलब्ध झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या १३.५ मिमी पाऊस जास्त झाला असून, जिल्ह्यातील मध्यम व मोठ्या १० प्रकल्पापैकी सात प्रकल्प तुडूंब भरले असून याप्रकल्पांमधून पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे. त्यामुळे भविष्यातील पाणीटंचाईची जिल्ह्यातील समस्या निकाली निघाली असून पाणीपुरवठा योजना असलेल्या उद्भवांना बऱ्यापैकी पाणी उपलब्ध झाले आहेत.दुसरीकडे जिल्ह्यातील आठ तालुक्यांनी पावसाची वार्षिक सरासरी ओलांडली असली तरी चिखली, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, लोणार आणि मेहकर या पाच तालुक्यात अद्यापही पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यातल्या त्यात चिखली तालुक्यात तुलनेने बरा पाऊस आहे. असे असले तरी जिल्ह्यातील मोठे व मध्यमप्रकल्प समाधानकारक भरल्याने भविष्यातील पाणीटंचाईची समस्या निकाली निघण्यास मदत होणार आहे. आॅक्टोबर अखेर पाणी आरक्षण समितीच्या बैठकीत उन्हाळ््यासाठी पिण्याचे पाणी आरक्षीत करण्याची समस्या निकाली निघल्यास जमा झाली आहे. गेल्या वर्षीप्रमाणे उद्भवामध्येच पाणी नसल्याने २९ पेक्षा अधिक पाणीपुरवठा योजनांसाठी पाणीच आरक्षीत करण्यात अडचण आली होती. ती स्थिती यंदा मात्र नाही. कोराडी आणि नळगगा हे दोन प्रकल्प जर सोडले तर बाकी प्रकल्प हे सध्या तुडूंब भरले असून या प्रकल्पामधून पाण्याचा विसर्गही करण्यात येत आहे. जिल्ह्यात वार्षिक सरासरी ६६७.८ मिमी पाऊस पडतो. मात्र सप्टेंबर संपण्याच्या एक दिवस अगोदरच बुलडाणा जिल्ह्याने पावसाची सरासरी ओलांडली असून वार्षिक सरासरीच्या १०२ टक्के पाऊस अर्थात ६८१.५ मिमी पाऊस पडला आहे. सरासरी पावसाच्या तुलनेत तो १३.७ मिमीने अधिक आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाDamधरण