संदीप भोपळे। लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा महासिद्ध : जळगाव जामोद तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी आदिवासीबहुल वस्ती असलेल्या गावामध्ये परदेशामधून (युनायटेड किंगडम) आलेले विद्यार्थी येथील आदिवासी संस्कृतीचा अभ्यास करीत आहेत.आठ विद्यार्थी युवा रुलर असोसिएशन नागपूर यांचे स्वयंसेवक हे सातपुड्यातील हनवतखेड, नांगरटी, रायपूर, उमापूर, चारबन, गारपेठ, राजुरा, हेलपाणी, डुक्करदरी या आदिवासी गावांमध्ये राहत असलेले नागरिक यांची जीवनशैली, भाषा, शिक्षण, आरोग्य, राहणीमान व या भागात शेतीमधून घेण्यात येणाऱ्या पिकांसंबंधित विषयाचा अभ्यास सदर विद्यार्थी करीत आहेत. इन्टरनॅशनल सिटिझन सर्व्हिस, वॉलन्टीअर सर्व्हिस ओव्हरसीज (आयसीएस,व्हीएसओ) युनायटेड किंगडम सरकार व युवा रुरल स्वयंसेवी संस्था नागपूरच्या संयुक्त विद्यमाने सदर विद्यार्थ्यांचा अभ्यास गट या परिसरात स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने अभ्यासाचे धडे गिरवत आहेत. या भागातील आदिवासी जनतेचे जीवनमान उंचवावे व शेती उत्पन्नात वाढ व्हावी, याकरिता जनजागृती करीत आहेत. परदेशी पाहुण्यांनी दिला स्वच्छतेचा संदेशजळगाव जामोद तालुक्यातील आदिवासीबहुल असलेल्या उमापूर गावामध्ये आज, १८ जुलै रोजी परदेशामधून आलेल्या या परिसरातील जनतेचे जीवनमान कसे असते, या विषयावर अभ्यास करीत असलेल्या विद्यार्थ्यांचा गट व पंचायत समिती जळगाव जामोदच्यावतीने आज ग्रामीण भागातील आदिवासी बांधवांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले व गावामध्ये संडास बांधण्याकरिता जनजागृती केली. त्यावेळी ९५ शौचालयांच्या बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी जळगाव जामोद पं.स.चे गटविकास अधिकारी किशोर काळपांडे, विस्तार अधिकारी संदीप मोरे, बांधकामचे अवजाळे, जळगाव जामोद तालुक्यातील सर्व ग्रा.पं.चे ग्रामसेवक मंडळी, पाणी व स्वच्छता मिशनचे गणेश दांडगे, उमापूर गावच्या सरपंचा, जि.प. शाळेचे सर्व शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर यांची उपस्थिती होती.
परदेशी विद्यार्थी सातपुड्यात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 12:17 AM