लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : काेराेना झालेल्या रुग्णांच्या सर्वच भागावर परिणाम हाेताे. विशेषत: शुन्य ते १९ वर्षांच्या मुलांना काेराेना झाल्यास त्यांच्या किडनीवर त्याचा परिणाम हाेताे. तसेच किडनीचा आजार असलेल्या रुग्णांचा मृत्यू हाेण्याचा धाेका अधिक असताे. त्यामुळे, अशा रुग्णांची विशेष काळजी घेण्यात येते. काेराेनाची दुसरी लाट ग्रामीण भागापर्यंत पाेहचली आहे. अनेक जणांचा काेराेनामुळे मृत्यू झाला आहे. काेराेना झालेल्या रुग्णांच्या रक्त, फुफ्फुसासह किडनीवरही परिणाम हाेताे. कोरोनामुक्त झालेल्या लहाण बालकांना मल्टी-सिस्टम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम (MSI-C) नावाचा आजार होत आहे. तिसरी लाट लहान मुलांसाठी धाेकादायक ठरणार असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. त्यातच हा किडणीचा आजार हाेत असल्याने पालकांची चिंता वाढली आहे. लहान मुलांना काेराेना झाल्यानंतर या आजाराच्या लक्षणाकडे पालकांनी लक्ष देण्याची गरज आहे. जिल्ह्यात दुसऱ्या लाटेत अनेक तरुणांना काेराेनाची लागण झाली हाेती. तसेच काही लहान मुलेही पाॅझिटीव्ह आली हाेती. किडणीचा आजार असलेल्या रुग्णास काेराेना झाल्यास त्याची विशेष काळजी घेतली जाते.
किडनीच्या रुग्णांची विेशेष काळजी किडनीचा आजार असलेल्या रुग्णास काेराेना हाेण्याची शक्यता अधीक असते. किडणीग्रस्तांना काेराेनामुळे मृत्यू हाेण्याचा धाेका अधिक असताे.त्यामुळे आराेग्य विभागाकडून विशेष काळजी घेण्यात येते. या रुग्णांची डायलेसीस व इतर उपचार नियमीत करण्यात येतात. तसेच त्यांना आहाराविषयीही मार्गदर्शन करण्यात येते.
किडनीच्या रुग्णांना काेराेना हाेण्याचा धाेका अधीक असताे. त्यामुळे, अशा रुग्णांची विशेष काळजी घेण्यात येते. शुन्य ते १९ वर्षांच्या मुलांना काेराेना झाल्यास त्यांना मल्टी-सिस्टम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम हा आजार हाेण्याची शक्यता असते. त्यामुळे, पालकांनी लहान मुलांना काेराेना झाल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. तातडीने डाॅक्टरांना दाखवावे. डाॅ. - नितीन तडस, जिल्हा शल्यचिकित्सक, बुलडाणा