लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : येथील चिखली रोडवरील मुलांचे निरीक्षणगृह तथा बालगृहातील कनिष्ठ काळजीवाहक (वॉर्डन)ने दोन मुलांचे लैंगिक शोषण केल्याचा घृणास्पद प्रकार ७ सप्टेंबर रोजी उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांनी वॉर्डनवर विविध गुन्हे दाखल केले असून, अटक करण्यात आली आहे. चिखली रोडवर मुलांचे निरीक्षणगृह, बालगृह आहे. या मुलांच्या वसतिगृहामध्ये बाल न्यायालयाकडून पाठविलेली लहान मुले आहेत. येथे नवृत्ती बारीकराव राजपूत (वय ५२) कनिष्ठ काळजीवाहक म्हणून नोकरीवर आहे. या निरीक्षणगृहात अनाथ, एक पालक असलेले तसेच विधी संघर्षग्रस्त असे ११ मुले आहेत. या ठिकाणी मुलांच्या देखभाल जबाबदारी येळगाव ये थील रहिवासी नवृत्ती बारीकराव राजपूत याला देण्यात आली होती. मागील काही वर्षांपासून नवृत्ती केअर टेकर म्हणून कारभार पाहत होता. २७ ऑगस्ट रोजी राजपूतने १६ व २३ वर्षीय युवकासोबत अनैसर्गिक कृत्य केले. तसेच याची वाच्यता कुठेही न करण्याची धमकीही दिली; मात्र मुलांनी याबाबत रिमांड होमचे अधीक्षक बी. एल. राठोड यांच्याकडे तक्रार केली. राठोड यांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ आपल्या वरिष्ठांना कळविले. याप्रकरणी वरिष्ठ जिल्हा महिला व बालविकास अधिकारी पी.एस. एंडोले यांनी पाच सदस्यांची समिती नियुक्त करून या प्रकरणाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली. दरम्यान, समितीने या प्रकरणाची तपासणी करीत राजपूत याच्याविरोधात अनेक पुरावे मिळवून अधीक्षकांसमोर सादर केले. त्यानंतर शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली. या तक्रारीनंतर नवृत्ती राजपूतवर कलम ३७७ अन्वये तसेच बाल लैंगिक अत्याचार कायद्यांतर्गत आयपीसी कलम ८ अंतर्गत व पॉस्को कायदा २0१0 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी नवृत्ती राजपूतला गुरुवारी सायंकाळी अटक केली. शुक्रवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
सीसी क ॅमेर्याचा अभावशहरातील रिमांड होम येथे नियमानुसार सीसी कॅमेरे बसवावयास हवे होते; मात्र संबंधित विभगाच्यावतीने याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे आता उघड होत आहे. या ठिकाणी तत्काळ सीसी कॅमेरे बसविण्यात यावे, अशी मागणी बालकांच्यावतीने केली जात आहे.
यापूर्वीही राजपूतवर गुन्हे दाखलराजपूत पूर्वी पैठण येथील बालगृहात नोकरीवर होता. ते थेही त्याच्यावर मुलांच्या लैंगिक छळाबाबत गुन्हे दाखल करण्यात आले होते; मात्र यातून तो निर्दोष सुटला. २0११ साली राजपूत बुलडाणा येथील निरीक्षणगृहात रुजू झाला. -