शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
5
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
6
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
7
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
8
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
9
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
10
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
11
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
12
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
13
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
14
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
15
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
16
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
17
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
18
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
19
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
20
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...

जागृती आश्रमाचे मठाधिपती शंकर महाराज बेपत्ता, चिठ्ठीत पाच जणांच्या नावाचा उल्लेख

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2018 06:10 IST

खामगाव: येथून जवळच असलेल्या शेलोडी येथील जागृती आश्रमाचे मठाधिपती प. पू. शंकरजी महाराज रविवारी सकाळपासून बेपत्ता झालेत. त्यामुळे त्यांच्या अनुयायांना मोठा धक्का बसला आहे. नापासांच्या आयुष्यात प्रेरणास्त्रोत निर्माण करणारे प. पू. शंकरजी महाराज आश्रमातील काहींच्या त्रासामुळे व्यथित झाले होते. जागृती आश्रमाची जमीन, महाराजांनी स्थापन केलेली शिक्षण संस्था आणि व्यवहारावरून काही ...

खामगाव: येथून जवळच असलेल्या शेलोडी येथील जागृती आश्रमाचे मठाधिपती प. पू. शंकरजी महाराज रविवारी सकाळपासून बेपत्ता झालेत. त्यामुळे त्यांच्या अनुयायांना मोठा धक्का बसला आहे. नापासांच्या आयुष्यात प्रेरणास्त्रोत निर्माण करणारे प. पू. शंकरजी महाराज आश्रमातील काहींच्या त्रासामुळे व्यथित झाले होते. जागृती आश्रमाची जमीन, महाराजांनी स्थापन केलेली शिक्षण संस्था आणि व्यवहारावरून काही जणांकडून त्यांना हेतुपुरस्परपणे त्रास दिला जात होता, असा उल्लेख शंकर महाराजांनी लिहिलेल्या चिठ्ठीत केला आहे. आश्रमाशी संबंधित पाच जणांनी सत्कार्याच्या मर्यादा ओलांडल्या. त्यामुळेच आपण खामगाव सोडत असल्याचेही महाराजांनी चिठ्ठीत नमूद केले आहे.जागृतीमधील वाद विकापोला जात असल्याचे निदर्शनास येताच, शंकर महाराजांनी गेल्या वर्षभरापूर्वीच सजनपुरी परिसरात तपोवनाची निर्मिती केली होती. तेव्हापासूनच महाराज शेलोडी येथील आश्रमात जाण्याचे टाळत होते.  परंतु यावादावर तोडगा निघत नसल्याने व्यथित झालेल्या महाराजांनी रविवारी तपोवन सोडले. आपला शोध न घेण्याची विनंतीही महाराजांनी चिठ्ठीत केली असून गेल्याकाही दिवसांपासून जागृतीमध्ये सुरू असलेल्या वादातून हा प्रकार घडल्याची चर्चा आहे. यासंदर्भात अधिक माहितीसाठी जागृती आश्रमातील पदाधिकाऱ्यांनी संपर्क साधला असता, त्यांच्याकडून महाराज निघून गेल्याच्या वृत्ताला दुजारो देण्यात आला. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिस तक्रारीसंदर्भात तपोवन येथे बैठक सुरू होती. यासंदर्भात सोशल मिडीयावर देखील पोस्ट व्हायरल झाली असून, अनुयांकडून महाराजांचा शोध घेण्यात येत आहे. काही भाविक रात्रीच तपोवन येथे दाखल झाले असून, महाराज सुखरूप परत यावेत, यासाठी तपोवनात  हनुमान चालीसा पठण आणि सामुहिक प्रार्थना केली जात आहे.सोमवारी चिठ्ठी वाचण्याचा दिला होता सल्ला!शंकर महाराज तपोवनातून निघून गेल्याचे रविवारी रात्री स्पष्ट झाले. महाराजांनी तपोवन सोडण्यापूर्वी विश्वासू सेवेक-यांकडे एक चिठ्ठी सोपविली होती. ही चिठ्ठी सोमवारी सकाळी १० वाजता वाचावी, अशी आज्ञा शंकर महाराजांनी केली होती. मात्र, धक्कादायक बाबीमुळे  या चिठ्ठीचे रात्री वाचन करण्यात आले. त्यानंतर ही धक्कादायक बाब उघडकीस आली.