लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव : गत चार महिन्यांपासून शेगाव नगरपालिकेला कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळत नसल्याची परिस्थिीती आहे. नायब तहसीलदारांनीही मुख्याधिकारी पदाचा पदभार स्विकारण्यास नकार दिल्याने हे स्पष्ट झाले आहे. परंतु यामुळे शेगाव शहरातील विकास कामे खोळंबली आहेत.जिल्हाधिकारी यांच्याकडून नायब तहसीलदार यांना मुख्याधिकारी पदाचा प्रभार देऊनही ते पदभार स्वीकारण्यास अनुत्सुक असल्याने याबाबत नगरपालिका गोटात विविध चर्चा रंगताना दिसत आहेत.शेगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी अतुल पंत यांच्यावर २ फेब्रुवारी रोजी लाचलुचपत विभागाने भ्रष्टाचारच्या आरोपाखाली कारवाई केल्याने व त्यांच्या विरूध्द गुन्हा दाखल झाल्याने नगरविकास मंत्रालयाने त्यांना निलंबित करून त्यांचा पदभार खामगावचे मुख्याधिकारी धनंजय बोरीकर यांच्याकडे अतिरिक्त म्हणून सोपविला होता. परंतु पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्याने व सध्या दुष्काळी परिस्थिती असल्याने जिल्हाधिकारी यांनी १० मे रोजी बोरीकर यांचा पदभार काढून तो नायब तहसीलदार भागवत यांना दिला. परंतु नायब तहसीलदार भागवत हे सदर पदभार सांभाळण्यास अनुत्सुक आहेत. त्यांनी पदभार स्वीकारला नाही. याबाबत नगरपालिका कार्यालयात चौकशी केली असता, राजकीय गोटात ते कॅडर मध्ये बसत नाहीत, म्हणून ते पद सांभाळू शकत नाही, अशी कारणे देण्यात येत होती. तर दुसरीकडे नाकापेक्षा मोती जड नको म्हणून राजकीय दबावपोटी नायब तहसीलदार हे पद सांभाळण्यास अनुत्सुक असल्याचे बोलल्या आहे. नगर पालिकेच्या सत्ताधाऱ्यांना वरचढ अधिकारी नको, अशीही चर्चा होत आहे. त्यामुळे सध्यातरी शेगाव नगरपालिकेला कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळाला नसल्याचे दिसून येते. परंतु यामुळे शेगाव शहरातील विकासकामे खोळंबली आहेत.
सध्या स्पर्धा परीक्षा असल्याने त्याची जबाबदारी माझेवर आहे तर नंतर निवडणूक निकाल असल्याने मी सध्या कुठलाही पदभार सांभाळू शकत नाही.- सागर भागवतनायब तहसीलदार शेगाव