शेगाव : शहरातील नागरिकांना तत्पर सुविधा मिळावी, यासाठी येथील नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अतुल पंत यांनी तंत्रज्ञानाचा उपयोग घेत शेगाव नगरपालिका हे अँप आता शेगाववासीयांच्या सेवेसाठी तयार केले आहे. या अँपच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या निर्मूलनासाठी मदत होणार आहे.आधुनिक तंत्रज्ञानामुळे जग जवळ येत आहे. त्यामुळे शेगाव नगरपरिषदेनेही आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत शेगाव नगर परिषदेचे मोबाइल अँप सुरू केले आहे. या अँपच्या माध्यमातून शेगावकरांना मूलभूत समस्या सोडविण्यासाठी नगरपरिषदेच्या वतीने अँपवर दाद मागता येणार आहे. नागरिकांना समस्या मांडल्यानंतर नागरिकांच्या तक्रारीवर योग्य उपाययोजना करुन समस्यांचे निराकरण होईल. हा अँप प्रत्येकाला आपल्या मोबाइलवर डाऊनलोड करता येऊ शकतो. याचा लाभ शेगाव नगरपालिकेच्या हितासाठी व शेगाव शहर हे समस्यामुक्त करण्यासाठी करावा, असे आवाहन मुख्याधिकारी अतुल पंत यांनी केले आहे.
शेगाव नगरपालिकेने तयार केले ‘अँप’!
By admin | Published: March 11, 2016 2:52 AM