शेंदुर्जन येथे एकनाथ खेडेकर यांचे वडील स्थायीक झाले. एकनाथ आणि तीघे भाऊ गुण्यागोविंदाने राहात होते. एकनाथ खेडेकर हे शिंगणे घराण्यात दत्तक गेल्याने त्यांचे आडणाव शिंगणे झाले. त्यांना भास्कर, दिनकर आणि अशोक ही तीन मुले आणि एक मुलगी आहे. चौघांचेही लग्न होऊन संसार थाटात सुरु आहेत. अशोक शिंगणे यांच्या मुलीचे लग्न जुळले. लग्नाची तयारी म्हणून वर आणि वधू कडील मंडळी लग्नाचे कपडे खरेदी करण्यासाठी अमरावती येथे गेले. कपडा खरेदी करून घराकडे परत येत असताना डोणगाव ते मालेगाव रोडवर त्यांच्या कारचा अपघात झाला. त्या अपघातात डॉ. दिनकर एकनाथ शिंगणे आणि मुलगी कल्याणी यांच्या मेंदुला जबर मार लागल्याने दोघेही जागीच गतप्राण झाले. अशोक आणि इतर तिघांना जबर मार लागल्याने जखमी झाले. घटनेची माहीती शेंदुर्जन गावात पसरताच संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले. डॉ. दिनकर एकनाथ शिंगणे यांचा पशु वैद्यकीय व्यवसाय असल्याने शेंदुर्जन परीसरात त्यांची चांगली ओळख होती. रात्री बे रात्री कुणाचेही गाय, म्हैस अडली तर धावून जात. एक प्रेमळ स्वभाव असल्याने डॉ. दिनकर विषयी आपुलकीची भावना असायची. एक हक्काचा माणूस गमावल्याची भावणा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसून आली.
गावात होळी पेटलीच नाही...
२८ मार्चला दोघांचेही मृतदेह सकाळी ११ वाजता शेंदुर्जन गावात पोहचताच त्यांना पाहण्यासाठी आणि अंतिम दर्शनासाठी जनसागर लोटला होता. हसतमुख चेहरा निस्तेज पाहून प्रत्येकाला हुंदका फुटला, आश्रू अनावर झाले. या मोठ्या अपघाती घटनेमुळे शिंगणे आणि खेडेकर परिवाराला होळी ऐवजी दोघांची चिता पेटवावी लागली.