खामगाव : उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी तालुक्यात ७ ठिकाणी अवैधरित्या दारू बाळगणार्याविरूध्द मंगळवारी कारवाई केली. या कारवाईत १४ हजार ५६0 रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.खामगाव तालुक्यात अवैधरित्या गावठी दारूचा महापूर वाहत आहे. अनेक गावातून दारूबंदीची मागणी होत आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी रूपाली दरेकर यांनी मंगळवारी ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या आवार, हिंगणा, कारेगाव याठिकाणी छापा मारून ६ जणांना अटक करण्यात आली आहे. महादेव बन्सीलाल सोळंके रा. आवार यांच्या घरी छापा मारला असता त्यांच्याजवळून ५ लिटर हातभट्टी दारू, १0 लिटर मोहसडवा असा एकुण ६८0 रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हिरासिंग जगदेव सोळंके रा. आवार यांच्याकडून पाच लिटर हातभट्टीची दारू २0 लिटर मोहसडवा असा एकुण १0३0 रूपयाचा मुद्देमाल, झामसिंग जगदेव सोळंके रा. आवार यांच्याकडून ५ लिटर हातभट्टी दारू व साहित्य असा ३३0 रूपयाचा मुद्देमाल, सहदेव शंकर सोळंके रा. आवार यांच्या जवळून ५ लिटर हातभट्टी दारू व साहित्य असा एकुण ३३0 रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यानंतर हिंगणा कारेगाव येथेही छापा मारण्यात आला. येथे संदीप रामदास जाधव यांच्याकडील २0 लिटर हातभट्टी दारू, २१0 लिटर मोहसडवा व कॅन साहित्य असा ११ हजार ६८0 रूपयाचा मुद्देमाल, मिलींद अशोक जाधव रा. हिंगणा यांच्याजवळून ४ लिटर हातभट्टी दारू, २४0 रूपये किंमती तर शिवदास मेघोजी जाधव यांच्याजवळून ४ लिटर हातभट्टी दारू व साहित्य असा २७0 रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामधील संदीप जाधव हा आरोपी फरार होण्यास यशस्वी झाला आहे. इतर ६ जणांविरूध्द खामगाव ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये कलम ६५ ई खंड ड मदाकानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गावठी दारुविक्रेत्यांवर धाड
By admin | Published: June 29, 2016 12:50 AM