१९ फेब्रुवारी रोजी शिवाजी महाराजांची ३९१ जयंती आहे. मागील ५ वर्षांपूर्वी बुलडाणा शहरात सर्वपक्षीय, सर्वधर्मीय तसेच सर्वसमावेशक शिवजयंती साजरी व्हावी, असा विचार पुढे येऊन सार्वजनिक शिवजयंती समितीचे गठण करण्यात आले होते. समितीअंतर्गत अध्यक्ष, कार्याध्यक्ष तथा उपाध्यक्ष आणि इतर पदांची निवड केली जाते. समितीचे पदसिद्ध सचिव म्हणून सुनील सपकाळ कार्यरत आहेत. शिवजयंती उत्सवातून छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार, त्यांची शिकवण आणि त्यांनी दिलेला सामाजिक समतेचा संदेश जनमानसांमध्ये पोहोचावा, अशा उद्देशातून या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. दरवर्षी शिवजयंती उत्सवाला मोठा प्रतिसाद लाभत आहे. अर्थात यावर्षी कोरोनाचे सावट असल्यामुळे शिवजयंती मर्यादित स्वरूपात साजरे करण्याचे बंधन असणार आहे. यावर सांगोपांग चर्चा होण्यासाठी येथील विश्रामगृहावर २७ जानेवारी रोजी बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला शिवप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष ॲड. जयसिंगराजे देशमुख आणि सचिव सुनील सपकाळ यांनी केले आहे.
शिवजयंती उत्सव समितीची २७ जानेवारीला बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2021 8:37 AM