विवेक चांदूरकर, लोकमत न्यूज नेटवर्क, खामगावःखामगाव केंद्राअंतर्गत असलेल्या पिंप्री गवळी, चितोडा, अंबिकापुर, बेलुरा, संभापूर यासह तालुक्यातील गावांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त आहेत. ही पदे त्वरीत भरण्यात यावी या मागणीसाठी शिवसेना पदाधिकारी गटशिक्षणाधिकारी यांना १८ जानेवारी निवेदन देण्याकरीता गेले असता तेथे कोणीही हजर नव्हते. त्यामुळे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी रिकाम्या खुर्चीला निवेदन चिटकवले.
निवेदनानुसार, तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा रामभरोसे चालू आहेत. कित्येक गावात शिक्षक संख्या कमी आहे. जिथे शिक्षक आहेत तिथे शिक्षण देत नाहीत. जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना ६० ते ७० हजार पगार असून सुद्धा विद्यार्थ्यांना व्यवस्थित शिक्षण मिळत नाही. त्यामुळे कित्येक जिल्हा परिषद शाळा बंद पडण्याच्या उंबरठ्यावर आहेत. खाजगी शाळांमध्ये शिक्षकांना दहा ते बारा हजार पगार असून शिक्षक व्यवस्थित शिक्षण देतात. जि.प.उर्दू शाळा चितोडा येथे मागील एक वर्षांपासून तीन विषय शिक्षकांची पदे रिक्त आहे. आतापर्यंत शाळेला शिक्षक न मिळाल्याने विद्यार्थ्यांचे प्रचंड शैक्षणिक नुकसान झाले असून,पालकांमध्ये निराशेसे वातावरण निर्माण झाले आहे. या विषयावर तातडीने लक्ष देऊन रिक्त असलेल्या जागेवर शिक्षकांची नेमणूक करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबवावे, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
यावेळी उपजिल्हा प्रमुख संजय अवताडे, विधानसभा संघटक सुरेश वावगे, तालुका प्रमुख राजेंद्र बघे, युवासेना तालुका प्रमुख अमोल फेरंग, अनुसूचित जाती जमाती तालुकाप्रमुख प्रकाश हिवराळे, उपतालुका प्रमुख गोपाल भिल, उपतालुका प्रमुख गजानन हुरसाळ, उपतालुका प्रमुख गजानन मोरखडे, उपतालुका प्रमुख सचिन पवार, विभाग प्रमुख हरिदास गव्हाणे, सुभाष पाटील, शिवसेनेचे गोपाल वरणकार, लक्ष्मण काकडे, शेख समीर, अक्षय दलाल, संकेत घुले, पवन मोसे, युवासेना उपतालुका प्रमुख सागर वाघ, सोशल मीडिया उप तालुका प्रमुख सचिन राऊत, शेख शफिक शेख फैजूला, शेख समद शेख मोहम्मद, सॉफियन नवेद खान, शेख रीजवान शेख, खलीक शेख येसूफ शेख, कासम शेख गफ्फार शेख, गफूर शेख जकोर शेख, शब्बीर शेख आनेस शेख, कासम शेख फिरोज शेख, मुझा शेख नईम शेख, रियाज रुकसान परवीण शेख, अमिज यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.