बुलढाणा: सिंदखेड राजातील पिंपळखुटा येथे खासगी प्रवाशी बसला झालेला अपघात ही एक भयावयह घटना आहे. आपल्या आयुष्यात अशा पद्धतीचा प्रसंग आपण बघितलेला नाही. या घटनेतून बोध घेण्याची गरज आहे. वाहनाचा वेग, वाहनाची तंदुरुस्ती याचाही विचार करण्याची अवश्यकता या घटनेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झाली असल्याचे मत पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा बुलडाण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले आहे.
या दुर्देवी घटनेची माहिती मिळाल्यानंतर सकाळी तातडीने १०:३० वाजता ते बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झाले. सोबतच शवगारात जाऊन त्यांनी अपघातामधील मृतकांच्या पार्थिवांची पहाणी केली. यावेळी आ. संजय गायकवाड यांच्यासह जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्यासह महसूल व आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
समृद्धीवर अपघातांची मालिका पहता याची व्याप्ती वाढणार नाही. या महामार्गाची मृत्यूचा सापळा अशी अेाळख होऊ नये यासह असे अपघात होऊ नये यासाठी व्यापक अशा उपायायेजना करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. महामार्गाच्या सुरवातीच्या टप्प्यासह शेवटच्या टप्प्यापर्यंत त्याला प्राधान्य देण्याची गरज आहे. या दुर्देवी घटनेत अनेक कुटुंब उद्धवस्थ झाले आहेत. घटनेतील दोषींवर तपासाअंती निश्चितच पोलिस कारवाई करतील. अपघातामध्ये झालेले मृत्यू पहाता तपासाअंती त्याची जबाबदारीही निश्चत होईलच. परंतू त्यासाठी प्रथमत: घटनेची चौकशी होणे गरजेचे आहे. असे अपघात टाळण्यासाठी प्रसंगी राज्यात कायदा सुद्धा करण्यास आम्ही मागेपुढे पहाणार नाही. परंतु प्रथमत: मुतकांची अेाळख, त्यांची डीएनए चाचणीही होणे गरजेचे आहे, असे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.