लोकमत न्यूज नेटवर्कमोताळा : नांदुरा तालुक्यातील मेंढळी येथील अमोल झांबेर या युवकाच्या खून प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीला नांदुरा न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. गुरूवारी बोराखेडी पोलिसांनी त्याला नांदुरा न्यायालयात हजर केले होते. अमोल मधुकर झांबरे याचा मंगळवारी २८ नोव्हेंबर रोजी मेंढळी शिवारात जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. दरम्यान, मृतकाचा भाऊ शरद मधुकर झांबरे याने बुधवारी बोराखेडी पोलिसांत तक्रार दिली होती. अमोल झांबरे याचे गावातीलच सोपान भिकाजी कोल्हे (४६) यांच्या मुलीसोबत गेल्या दोन वर्षांपासून प्रेम संबंध होते. परंतू सोपान कोल्हे यांना ते मान्य नव्हते. त्यामुळे सोपान कोल्हे यांनी संगनमताने अमोल झांबरे यास जाळून ठार मारल्याचे तक्रारीत नमूद केले होते. त्यावरून बोराखेडी पोलिसांनी आरोपी सोपान भिकाजी कोल्हे याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्यास गजाआड केले. गुरुवारी त्याला नांदुरा न्यायालयासमोर हजर केले असता, चार डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास ठाणेदार अविनाश भामरे, पीएसआय कडे खाँ पठाण यांच्या मार्गदर्शनात पोलिस हेडकॉन्स्टेबल रामदास वाढे करीत आहेत.
मेंढळी शिवारातील खून प्रकरण; 'त्या' आरोपीस पाच दिवसांची पोलिस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2017 12:11 AM
नांदुरा तालुक्यातील मेंढळी येथील अमोल झांबेर या युवकाच्या खून प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीला नांदुरा न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. गुरूवारी बोराखेडी पोलिसांनी त्याला नांदुरा न्यायालयात हजर केले होते.
ठळक मुद्देअमोल मधुकर झांबरे याचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळला होतापोलिसांनी आरोपी सोपान कोल्हे यास गजाआड केले होते