धाड (जि. बुलडाणा), दि. १७: शिवसेना व युवा नेता बुलडाणा तालुका धाड विभागातर्फे १६ मार्च रोजी येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेवर डफडे बजाव आंदोलन करण्यात आले. येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या शाखेत अधिकार्यांनी धाड गावातील शाखेत आसपासच्या गावामधून येणार्या शेतकरी, मजूर व ङ्म्रावणबाळ लाभार्थींचे बचतखाते उघडण्यास मनाई केल्याने शिवसेना धाड विभागाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना याबाबत विचारणा करताच त्यांना अरेरावीची भाषा वापरून बँकेतून परतून लावले. या घटनेची गंभीर दखल घेत शिवसेना व युवासेना कार्यकर्त्यांनी तसेच शिवसेना जिल्हाध्यक्ष जालींधर बुधवत, जि.प. विरोधी नेते अशोक इंगळे यांचे नेतृत्वात शिवसैनिकांनी ४ ऑगस्ट रोजी लीड बँकेला निवेदन देऊन धाड ग्रामीण बँकेच्या मॅनेजरच्या मनमानी कारभारावर कारवाई करण्याची मागणी केली. परंतु वेळेत कारवाई करण्यात न आल्याने १६ ऑगस्ट रोजी भव्य डफडे बजाव आंदोलन करण्यात आले. यावेळी अशोक इंगळे, गजानन टेकाळे, गजानन धंदर, विजय इतवारे, जगदीश मानतकर, योगेश संतापे, बबलू वाघुर्डे, प्रताप वाघ, अनिल कुटे, शेषराव सावळे, सुरेश धनावत, राजु गायकवाड यांच्यासह असंख्य शिवसेना कार्यकर्ते हजर होते. यावेळी ग्रामीण बँकेचे जिल्हास्तरीय अधिकारी यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून सर्व नागरिकांचे, शेतकर्यांचे बचत खाते उघडण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन थांबविण्यात आले.
शिवसेनेचे ‘डफडे बजाव’ आंदोलन
By admin | Published: August 18, 2016 12:53 AM