चिखली : येथील सिंधी समाज महिला मंडळाची कार्यकारिणी स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये अध्यक्षपदी शोभा गुरुदासाणी, तर सचिवपदी पूजा गोलाणी यांची निवड करण्यात आली आहे.
समाजातील महिलांकडून सिंधू संस्कृतीचे जतन व्हावे, तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून युवापिढीमध्ये नवचैतन्य निर्माण व्हावे या उद्देशाने येथील सिंधी समाजातील महिलांची बैठक पार पडली. या बैठकीत संस्थापक अध्यक्षा गीता कन्हैयालाल भोजवानी यांच्या उपस्थितीत सर्वानुमते कार्यकारिणी स्थापन करण्यात आली आहे. कार्यकारिणीत अध्यक्षपदी शोभा पृथ्वीराज गुरुदासाणी, उपाध्यक्षपदी शोभा जवाहर वाधवाणी, डॉ. भारती विजय गुरुदासाणी, प्रिया वसंत भोजवानी, सचिवपदी पूजा गिरीश गोलानी, सह-सचिव ज्योती यशपाल गोलानी, कोषाध्यक्षा दुर्गा दयाराम मूलचंदानी, प्रसिद्धी प्रमुख काजल संजय हरगुनानी, कविता शंकर भोजवानी, तर मार्गदर्शक म्हणून पुष्पा भीष्म गुरुदासाणी, खुशी सुनील भोजवानी, कशिश गोपाल गोलानी आणि सल्लागार म्हणून सरस्वती तुलसीदास गुरुदासाणी, चंपा बुलचंद वाधवाणी, मोहिनी गोपालदास नागवानी, आशा वरंदमल वाधवाणी, कांता गोवर्धनदास लालवानी, आरती राजेश जेठानी, कमला टेकचंद पंजवानी, तर कार्यकारिणी सदस्य म्हणून अनिता भगवानदास नागवानी, काजल सुनील वाधवाणी, संगीता पोपटलाल परियानी, संगीता अशोक आयलानी व वीना महेंद्र मोटवानी यांची निवड करण्यात आली आहे.