नांदुरा : तालुक्यातील मामुलवाडी येथे अतिवृष्टीने भिंत पडल्याने वडिलांचा मृत्यू झाल्याची घटना १९ जुलै रोजी सकाळी घडली. या घटनेत मुलगा जखमी झाला आहे.
मामुलवाडी चांदुर बिस्वा, खुमगाव, केदार, येरळी येथे बुधवारी सकाळी जोरदार पाऊस झाला. अतिवृष्टीमुळे मामुलवाडी येथे जाणारे रस्ते बंद असून संपर्क तुटला आहे. अल्पभूधारक शेतकरी प्रताप नामदेव गावंडे (वय ६० वर्षे) व त्यांचा मुलगा शुभम प्रताप गावंडे दूध काढण्यासाठी घरामागे गेले असता. त्यांच्या अंगावर देवीच्या मंदिराची भिंत पडून दोघेही मातीच्या ठीकाऱ्याखाली दबले.
गावकऱ्यांनी त्यांना मातीच्या ढिगार्याखालून काढले. मात्र, प्रताप गावंडे यांचा मृत्यू झाला. अतिवृष्टीमुळे मामुलवाडीत येणारे सर्व रस्ते बंद असल्याने गावाचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे वेळेवर मदत मिळाली नाही. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गौरव पाटील यांनी मदत केली.