लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात गत काही दिवसांपासून काेराेना रुग्णांची संख्या वाढत आहे. काेराेना संसर्ग राेखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध निर्बंध लादण्यात आले आहे. शनिवारी सायंकाळी ६ ते साेमवारी सकाळी ६ पर्यंत संपूर्ण लाॅकडाउनचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. तसेच यादरम्यान संचारबंदीही लागू करण्यात आली आहे. मात्र, रविवारी बुलडाणा शहरात दुकाने बंद असली तरी संचारमात्र मुक्तपणे सुरू हाेता.गत काही दिवसांपासून बुलडाणा शहरासह जिल्ह्यात काेराेना रुग्णांची संख्या वाढतच आहे. वाढता काेराेना संसर्ग राेखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध निर्बंध लादले असून विविध आदेश प्रशासनाकडून जारी करण्यात आले आहेत. यामध्ये शनिवारी सायंकाळपासून साेमवारी सकाळी ६ वाजेपर्यंत लाॅकडाउन करण्यात आले हाेते. तसेच संचारबंदी लागू करण्यात आली हाेती. रविवारी बुलडाणा शहरातील दुकाने बंद हाेती. तसेच आठवडी बाजारात शुकशुकाट हाेता. मात्र, मुख्य रस्त्यावर वाहनाची वर्दळ सुरूच हाेती. शहरातील एकाही चाैकात पाेलीस कर्मचारी नव्हता. तसेच नागिरकांनाही मास्कचा विसर पडल्याचे दिसले. काेराेना रुग्णांची संख्या वाढत असली तरी नागिरकांमध्ये गांभीर्य नसल्याचे चित्र आहे. दरराेज जिल्ह्यात ३५० पेक्षा जास्त काेराेना पाॅझिटीव्ह रुग्ण निघत आहेत. जिल्हा प्रशासन काेराेनावर उपाय याेजना करण्यासाठी आदेश काढते. मात्र, त्या आदेशाची इतर विभागाकडून अंमलबजावणीच हाेत नसल्याचे चित्र आहे. विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाइ हाेत नसल्याने नागरिकही निर्ढावले आहेत. तसेच चाैकाचाैकात विनाकारण फिरणाऱ्यांची चाैकशी करण्यासाठी पाेलीसच नसल्याने संचारबंदीतही नागरिकांचा मुक्त संचार सुरू असताे. वाढती काेराेना रुग्णांची संख्या पाहता नागरिकांनी काेराेनाविषयक नियमांचे पालन करण्याची गरज आहे.
बुलडाण्यात दुकाने बंद, संचार सुरूच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2021 11:31 AM