लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : लॉकडाऊनमध्ये मद्याची दुकाने बंद असतानाही जिल्ह्यात २०१९-२० च्या तुलनेत ९३ हजार ७७२ लिटर दारूची अधिक विक्री झाली असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. बुलडाणा जिल्ह्यात २०१९-२० या वर्षात एक कोटी ३७ लाख १९ हजार ११५ लिटर दारूची विक्री झाली होती. त्या तुलनेत २०२०-२१ मध्ये एक कोटी ३८ लाख १२ हजार ८८७ लिटर दारूची विक्री झाली आहे. दरम्यान, २०१९-२० च्या तुलनेत देशी दारूची विक्री ५ टक्क्यांनी वाढली असल्याचे निदर्शनास येत आहे. त्या तुलनेत विदेशी दारूची विक्री चार टक्क्यांनी घटली असून, बीअरची विक्री तब्बल १७ टक्क्यांनी घटली आहे. गंमत म्हणजे वाईनची विक्री जिल्ह्यात ५३ टक्क्यांनी वाढली असल्याचे एकंदरीत चित्र आहे. दुसरीकडे मद्यविक्रीच्या माध्यमातून जिल्ह्याला जवळपास नऊ कोटी रुपयांचा महसूलही प्राप्त झाला असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. गंम्मत म्हणजे वाईनच्या विक्रीतही ५३ टक्के वाढ झाली आहे. वर्षभरात ९ काेटी रूपयांचा महसूल राज्य उत्पादन शुल्क विभागाला मद्य विक्रीतून मिळाला आहे. तुलनेत तसा ताे कमी असला तरी लिटरमध्ये दारूची विक्री वाढली.
एक कोटीची दारू जप्तलॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यात मद्यविक्री बंद होती. मात्र, छुप्या पद्धतीने दारूची विक्री होत होती. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाने पोलिसांच्या सहकार्याने केलेल्या कारवाईत जिल्ह्यात एक कोटी सात लाख १४ हजार ४७ रुपयांची विनापरवाना विक्री होत असलेली दारू जप्त केली आहे. या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने १,१६३ प्रकरणात कारवाई करून ९३९ व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.
बीअर विक्री घटली, ‘देशी’ची चलतीजिल्ह्यामध्ये देशी दारूच्या विक्रीत ५ टक्क्यांनी २०१९-२० च्या तुलनेत वाढ झाल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाची आकडेवारी सांगते. विदेशी दारूच्या विक्रीत ४ टक्क्यांनी घट आली आहे, तर बीअरच्या विक्रीत तब्बल १७ टक्क्यांनी घट आली आहे.