- नीलेश जोशीबुलडाणा: कर्जमाफी मिळालेल्या परंतू पीक कर्जापासून गतवर्षी वंचित राहलेल्या जिल्ह्यातील ९० हजार शेतकºयांना बँकांनी प्राधान्यक्रमाने पीक कर्ज वाटप करण्याच्या सुचना सहकार आयुक्त सतिश सोनी यांनी बुलडाणा येथे दिल्या. गेल्या खरीप हंगामात जिल्ह्यातील पीक कर्ज वाटपाचा टक्का अवघा ३४.१५ टक्के होता. त्यामुळे यंदा राष्ट्रीयकृत, व्यापारी आणि विदर्भ कोकण ग्रामीण बँकांनी प्राधान्याने या शेतकºयांपर्यंत पोहेचून त्यांना पीक कर्ज द्यावे असे सहकार आयुक्तांनी अधोरेखीत केले आहे. मुळात कर्जमाफी मिळालेल्या १०० टक्के शेतकºयांना नव्याने पीक कर्ज उपलब्ध करण्याचे त्यांनी सांगितले.बुलडाणा येथील जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेत चार जून रोजी सहकार आयुक्तांनी जिल्ह्यातील पीक कर्ज वाटपाची स्थिती जाणून घेतली. त्यावेळी गत वर्षी जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत तथा व्यापारी बँकांनी तब्बल ९० हजार शेतकºयांना कर्जमाफी मिळाली असतानाही त्यांना पीक कर्ज दिले नसल्याची गंभीर बाब समोर आली होती. त्यावेळी ही बाब गांभिर्याने घेत सहकार आयुक्त सतिश सोनी बँकाना उपरोक्त निर्देश दिले आहेत. या बैठकीला जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थाक उत्तम मन्वर, जिल्ह्यातील बँकांचे अधिकारी, जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक खरात, जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांच्यासह अन्य उपस्थित होते.कर्जमाफी मिळाली त्यांना पीक कर्ज वाटप करणे आवश्यक आहे. मात्र गेल्या वर्षी त्याची प्रभावी अंमलबजावणी न झाल्यामुळे अनेक शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहले होते. बँकांच्या प्रतिनिधींनी शेतकरी वर्गच बँकांकडे अॅप्रोच झाला नसल्याचे सांगताच सहकार आयुक्तांनी बँकानी स्वत: अशा शेतकºयांकडे अॅप्रोच होऊन त्यांना प्राधान्याने पीक कर्ज वाटप करावे, असे स्पष्ट केले. पीक कर्जाचा मुुद्दा बँकांनी अत्यंत गांभिर्याने घेण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या असल्याचे या बैठकीस उपस्थित असलेल्या सुत्रांनी स्पष्ट केले. प्रामुख्याने ग्रामीण बँका व व्यावसायिक बँकांनी कर्जमाफी मिळालेले शेतकरी १०० टक्के कव्हर केले नसल्याचेही सहकार आयुक्तांनी या बैठकीत स्पष्ट केले. परिणामस्वरुप गेल्या खरीप हंगामात एक हजार ७४५ कोटींचे उदिष्ट असताना अवघे ५९६ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप झाले. त्याचा टक्काही अवघा ३४.१५ टक्के होता. २०१५-१६ आणि २०१६-१७ अनुक्रमे ७५ टक्के व ७८ टक्के पीक कर्ज वाटप झाले होते. ते पाहता यंदा गतवर्षीसारखा प्रकार होणार नाही, याची काळजी घेण्याबाबतही त्यांनी सुचीत केले.
कर्जमाफी मिळालेल्या १०० टक्के शेतकºयांना बँकांनी पीक कर्ज वाटप करावे, असे निर्देश सहकार आयुक्त सतीश सोनी यांनी दिले आहेत. जिल्हा बँकेतील कर्जमाफी मिळालेल्या २२ हजार शेतकºयांना राष्ट्रीय बँका तथा व्यापारी बँकांकडू पीक कर्ज देण्यात येणार आहे. त्यासंदर्भाने आम्ही तसे सर्टीफाईड करून दिलेले असल्याने या शेतकºयांना पीक कर्ज मिळण्यात अडचण जाणार नाही. ८१७ गावातील या शेतकºयांची नावे सर्टीफाईड करून राष्ट्रीयकृत बँकांकडे दिल्या गेली आहेत.- नानासाहेब चव्हाण, जिल्हा उपनिबंधक, बुलडाणा