सिंदखेडराजा (जि. बुलडाणा): विदर्भाची पंढरी श्रीक्षेत्र शेगाव येथील श्री संत गजानन महाराज यांची पालखी विठ्ठलाचे दर्शन घेऊन परतीच्या प्रवासात असून, मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे १३ ऑगस्ट रोजी मुक्कामाला येत आहे. पंढरपूर येथील आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाचे दर्शन घेऊन श्री संत गजानन महाराजांची पालखी दरवर्षीप्रमाणे यंदाही जालना-नाव्हा मार्गे सिंदखेडराजा येथे गुरुवारी येत आहे. मराठवाडा-विदर्भाच्या हद्दीवर ह्यश्रींह्णच्या पालखीचे १३ ऑगस्ट रोजी दरवर्षीप्रमाणे दुपारी २ वाजता आगमन होणार आहे. १४ ऑगस्ट रोजी पालखी किनगावराजा, दुसरबीड मार्गे बिबी येथे मुक्कामासाठी मार्गस्थ होणार आहे. श्री संत गजानन महाराजांची पालखी १३ ऑगस्ट रोजी सिंदखेडराजा येथे जिजामाता कनिष्ठ महाविद्यालयात मुक्कामी राहील. त्यानंतर १४ ऑगस्ट रोजी सकाळी सिंदखेडराजाहून किनगावराजा मार्गे पालखी बिबी येथे मुक्कामी पोहचेल. तेथून १५ ऑगस्टला 'श्रीं'ची पालखी किनगाव जट्ट मार्गे लोणार येथे मुक्कामी राहील. १६ ऑगस्टला लोणार येथून पालखी सुलतानपूर मार्गे मेहकर येथे मुक्कामाला पोहोचणार आहे.
‘श्रीं’ची पालखी आज बुलडाणा जिल्ह्यात
By admin | Published: August 13, 2015 12:26 AM