शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
2
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
3
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
4
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका
5
UPSC Result : निरक्षर आईने दाखविला यूपीएससीचा मार्ग;डाॅ. अक्षय मुंडे याची यशाला गवसणी
6
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
7
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
8
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
9
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
10
जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोघे जखमी
11
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
12
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
13
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
14
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
15
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
16
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
17
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
18
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
19
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
20
आदिवासी भागातून UPSC परीक्षेत यश मिळवणारे पहिलेच युवक; इंटरनेटवरील व्हिडीओद्वारे केला अभ्यास

शिकागोत पार पडले श्री गजानन महाराज भक्त संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2021 16:30 IST

Shri Gajanan Maharaj Bhakt Sammelan held in Chicago : अमेरिकेतील शिकागो येथे नुकतेच संत गजानन महाराज भक्त संमेलन संपन्न झाले.

- गजानन कलोरे

शेगाव : अमेरिकेतील शिकागो येथे नुकतेच संत गजानन महाराज भक्त संमेलन संपन्न झाले.शिकागो अमेरिका येथे डॉ. श्री राम चक्रवर्ती यांचे काली बारी मंदिर आहे. मंदिर विस्तीर्ण जागेत आहे. मंदिरात कालीमातासोबत संत साईबाबांची मूर्ती आहेत. या मंदिरात कोलकाता येथून नेण्यात आलेली संत गजानन महाराजांची मूर्ती आहे. तसेच मुंबई येथील एका भाविक गजानन महाराज भक्ताने भेट दिलेली मूर्ती आहे. मंदिरात गजानन महाराजांची मूर्ती आहे, हे आसपासच्या भक्तांना कळावे, तिथे गजानन महाराज भक्तांनी एकत्र यावे, या निमित्ताने संत गजानन महाराज भक्त संमेलन आयोजित करण्याचे ठरविण्यात आले. कार्यकर्त्यांच्या या विचाराला राम चक्रवर्ती यांचा पाठिंबा मिळाला आणि अमेरिकेत संत गजानन महाराज भक्त संमेलन उत्साहात पार पडले. राम चक्रवर्ती आणि लीना चक्रवर्ती यांच्या कडून दीपप्रज्वलन करून संमेलनाचा शुभारंभ झाला. गजानन स्तवन होऊन भक्तीगीत, भजन आदी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले. मेघना अभ्यंकर यांनी नांदेडकर गुरुजी यांच्यावर पुस्तक लिहीले आहे. हे पुस्तक शेगांवला चाळीस वर्षे समाधी मंदिरात पूजा करण्याचं भाग्य लाभलेल्या नांदेडकर गुरूजींवर लिहीले आहे. त्या पुस्तकाच्या इंग्लिश आवृत्तीचं विमोचन संमेलनात करण्यात आलं. तसेच मंदाकिनी पाटील यांनी भक्तांसमोर ‘संजीवन समाधी’ या विषयावर व्याख्यान दिले. तर ज्योत्स्नाताई मोदले यांनी आपण असावे निवांत तरीच भेटे जगन्नाथ या विषयावर मनोगत व्यक्त केले. मुखोदगत पारायणकर्ते डॉ गजानन खासनीस यांनी उपस्थितांना अभिषेकाचं महत्व समजावून सांगितले. कार्यक्रमात शेवटी विद्याताई पडवळ यांचे आॅनलाईन श्रीगजानन विजय ग्रंथाचं संपूर्ण मुखोदगत पारायण सादर केले.

 कार्यक्रमाची पूर्व तयारी म्हणून शेगांवहून गजानन महाराजांच्या एकशे एकवीस पितळी मूर्त्या नेण्यात आल्या. त्या मूर्त्या भक्तांना देण्यात आली. संमेलनात काही मूर्त्यांवर प्रत्यक्ष कार्यक्रम स्थळी तर काही मूर्त्यांवर भक्तांच्या घरी अभिषेक करण्यात आला. वेगवेगळ्या शहरातून, राज्यातून सहाशे भक्त संमेलनात सहभागी झाले होते. 

भाविकांना साहित्य पाठविणारसंत गजानन महाराजांशी संबंधित विविध ग्रंथ साहित्य काली बारी मंदिरात उपलब्ध आहे. अमेरिकेत स्थायिक असलेल्या संत गजानन महाराजांच्या भक्तांसाठी विविध राज्यात पाठविण्यात येणार आहे.

टॅग्स :AmericaअमेरिकाGajanan Maharajगजानन महाराजShegaonशेगाव