हा आजार जनुकीय दोषामुळे होत असल्याने तो अनुवंशिक आहे. आई- वडिलांकडून हा आजार अपत्यांमध्ये येतो. अनुवंशिक शास्त्राच्या नियमांनुसार हा दोष दोन प्रकारांत आढळतो. यातला एक प्रकार म्हणजे ‘सिकलसेल वाहक’ (कॅरिअर) आणि दुसरा म्हणजे ‘सिकलसेल ग्रस्त’ (सफरर). वाहक व्यक्ती ही केवळ आजाराची वाहक असते. या व्यक्तीत आजाराची कोणतीच लक्षणे दिसत नाहीत, तसेच नियमित रक्त देण्याची गरज पडत नाही. सिकलसेलग्रस्तांना मात्र नियमित रक्त द्यावे लागते. तीन प्रकारच्या चाचण्या केल्यानंतर सिकलसेलचे निदान करण्यात येते. रुग्णांची सुरुवातीला साेलुबिटी चाचणी करण्यात येते. यामध्ये पाॅझिटिव्ह आलेल्या रुग्णांची दुय्यम चाचणी करण्यात येते. त्यानंतर एचपीएससीएल ही चाचणी करण्यात आल्यानंतर ताे रुग्ण सिकलसेलचा वाहक आहे की ग्रस्त, याविषयी निदान हाेेते. सिकलग्रस्त असल्यास त्यांना जिल्हा शल्य चिकित्सकांच्या स्वाक्षरीने प्रमाणपत्र देण्यात येते. त्यानंतर या रुग्णांना जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्तपेढीतून माेफत रक्त देण्यात येते, तसेच त्यांच्यासाठी रक्त राखीव ठेवले जाते. काेराेनानंतर लाॅकडाऊन करण्यात आले हाेते. लाॅकडाऊनमध्येही अशा रुग्णांसाठी रक्ताचा साठा उपलब्ध करून देण्यात आला हाेता, तसेच रुग्णांना माेफत प्रवासासह इतर याेजनांचाही लाभ देण्यात येताे.
अशी घ्यावी काळजी
सिकलसेल हा अनुवंशिक आजार आहे. वाहक रुग्णांनी निराेगी व्यक्तीसोबत लग्न केल्यास सिकलसेल हाेण्याचा धाेका ५० टक्क्यांनी कमी हाेताे; मात्र लग्न करणारे दाेन्ही सिकलसेलग्रस्त असतील तर त्यांच्या अपत्यांनाही हा आजार हाेताे. त्यामुळे लग्न करण्यापूर्वी सिकलसेलची चाचणी करण्याची गरज आहे. आजारावर उपचार नसल्याने सावधगिरी हाच उपाय आहे.
२० ते २५ वर्षे कमी आयुष्य
सिकलसेलग्रस्त रुग्णांचे आयुष्य सर्वसाधारण व्यक्तींपेक्षा २० ते २५ वर्ष कमी आयुष्य राहते. वाहक असलेल्या रुग्णांना कुठलाही त्रास हाेत नाही; मात्र त्यांच्या अपत्यांना हा आजार हाेण्याची शक्यता असते.
आजाराविषयी सुरू आहे जनजागृती
सिकलसेल आजाराविषयी आराेग्य विभागाच्यावतीने जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. नितीन तडस यांच्या मार्गदर्शनात जनजागृती करण्यात येत आहे. ग्रामसभा तसेच विविध कार्यक्रमांमध्ये ग्रामस्थांना या आजाराविषयी माहिती देण्यात येते, तसेच चाचणी करण्याविषयी प्राेत्साहन देण्यात येत आहे. त्यासाठी जिल्हा स्तरावर विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
१५२० सिकलसेल कॅरियर
२६३ सिकलसेलग्रस्त
३० सिकलसेल पाॅझिटिव्ह