लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणारे संरक्षित निसर्ग पर्यटन सुरू करण्याचे २५ जून रोजी वन्यजीवचे विभागीय वनअधिकारी यांनी आदेश दिले होते. मात्र, आता पुन्हा जिल्ह्यात तिसऱ्या स्तरातील निर्बंध सोमवारपासून लागू करण्यात आले आहे. परिणामी, वनपर्यटन सुरू ठेवायचे की नाही, याबाबतचे वन्यजीव विभागाने शासनाकडे मार्गदर्शन मागितले आहे. त्यासंदर्भाने बुलडाणा जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांना वन्यजीव विभागाने अनुषंगिक विषयान्वये एक पत्रही पाठविण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती वन्यजीव विभागातील सूत्रांनी दिली.बुलडाणा जिल्हा सलग दोन आठवडे पहिल्या स्तरात राहिल्यामुळे ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये वनपर्यटन सुरू करण्याचा निर्णय वन्यजीव विभागाने घेतला होता.. त्यातच राज्य शासनाच्या निर्देशानुसार राज्यातील सर्वच जिल्ह्यांत तिसऱ्या स्तरातील निर्बंध कोरोना प्रतिबंधासाठी लागू करण्यात आले आहे. त्यामुळे संभ्रम निर्माण झालेला आहे.
वनपर्यटन पुन्हा बंद होण्याचे संकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 11:37 AM