- ब्रम्हानंद जाधव
बुलडाणा: रेशीमच्या मागणीमध्ये दरवर्षी साधारणत: २० टक्क्याने वाढ होत आहे. परंतू पश्चिम वºहाडामध्ये रेशीमला मार्केटचा अभाव असल्याने येथील शेतकरी कर्नाटमध्ये रेशीमची विक्री करीत आहेत. त्यातही ३५० ते ४०० रुपये अत्यल्प दरामुळे शेतकºयांमध्ये नाराजी दिसून येत आहे. रेशीम शेती उद्योगाला राज्यात भरपूर वाव आहे. शासनाकडूनही तूती लागवड वाढविण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. राज्यात सरासरी १० ते १२ हजार एकर क्षेत्रावर तुतीची लागवड केली जाते. राज्यात १८ जिल्ह्यात तुती रेशीम तर गडचिरोली, भंडारा, गोंदीया, चंद्रपूर या चार जिल्ह्यात टसर रेशींमशेती योजनेस प्रोत्साहन दिले जाते. संपूर्ण राज्यात ८ लाख किलोपेक्षा अधिक रेशीम कोषाचे उत्पादन होत आहे. त्यात एकट्या बुलडाण्या जिल्ह्यातच एक कोटी ७३ लाख २० हजार ६७५ रुपयांचे उत्पादन घेतल्या जाते. पश्चिम वºहाडातील बुलडाणा, अकोला वाशिम जिल्ह्यातील हवामान कमी, अधिक प्रमाणात तुती लागवडीकरिता पोषक आहे. रेशम कोटक संगोपनाकरिता लागणारे २५ ते २८ अंश सेंल्सिआस तापमान व ६५ ते ८५ टक्के आर्द्रता येथे मिळू शकते. त्यामुळे वºहाडातूनही आता रेशीमचे उत्पादन वाढण्यास सुरूवात झाली आहे. परंतू याठिकाणी मार्केट मिळत नसल्याने शेतकºयांना कर्नाटकच्या मार्केटला रेशीम विक्री करावी लागत आहे. परिणामी वाहतूक खर्चही शेतकºयांना परवडत नाही. बुलडाण्यासाठी जालना येथे मार्केट आहे, परंतू त्या ठिकाणी चांगला भाव मिळत नसल्याची ओरड शेतकºयांची आहे.
वºहाडात बीव्ही जातीची सर्वाधिक लागवडपश्चिम वºहाडामध्ये प्रामुख्याने संकरित व दुबार जातीचे कोष उत्पादन घेतले जाते. सुणर्वआंध्र, कोलार गोल्ड या बहुवार सी. बी. जातीचे व सी. एस. आर. आणि सी. एस. आर. हायब्रीड हे दुबार जातीचे संगोपन केले जाते. या बायहोल्टाईन पांढºया कोशापासून उत्पादीत केलेल्या सुतास जागतिक मागणी आहे. एका किलो ग्रॅममध्ये ६०० ते एक हजार कोष बसतात. बी.व्ही. जातीच्या कोषाची लागवड वºहाडात जास्त होते.