विवेकानंद जन्मोत्सवाची साध्या पद्धतीने सांगता :
७५ हजार दर्शकांची ऑनलाइन सोहळ्याला पसंती
हिवरा आश्रम : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर विवेकानंद आश्रमच्या कार्यकारी मंडळाने विवेकानंद जन्मोत्सव मर्यादित उपस्थित साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. दरवर्षी भरगच्च भाविकांच्या उपस्थितीत व महाप्रसादाने विवेकानंद जन्मोत्सवाची सांगता होते. मात्र यावर्षी कोरोनामुळे सर्व कार्यक्रम रद्द करीत साध्या पद्धतीने विवेकानंद जन्मोत्सवाचा समारोप गुरुवारी करण्यात आला.
गेल्या अनेक वर्षांची परंपरा लाभलेल्या विवेकानंद जन्मोत्सव सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी देशातील कानाकोपऱ्यातून भाविक येत असतात. मात्र यावर्षी अत्यंत मर्यादित भाविकांच्या उपस्थित हा सोहळा विवेकानंद आश्रमात संपन्न झाला आहे. भाविकांसाठी विवेकानंद जन्मोत्सवाचे ऑनलाइन प्रसारण आश्रमच्या यू-ट्यूब,फेसबुकवर करण्यात आले होते. आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत विवेकानंद आश्रमाने विवेकानंद जन्मोत्सव सोहळ्याचे ऑनलाइन प्रसारण होत आहे. विवेकानंद जन्मोत्सव भारतासह जगाच्या कानाकोपऱ्यातील जवळपास ७५ हजारहून अधिक दर्शकांनी ऑनलाइन पाहिल्याची माहिती विवेकानंद आश्रमचे सचिव संतोष गोरे यांनी दिली. दि. २ ते ४ फेब्रुवारीदरम्यान हा सोहळा भाविकांनी ऑनलाइन अनुभवला. विवेकानंद जन्मोत्सवाच्या पहिल्याच दिवशी तब्बल ७५ हजार दर्शकांनी हा सोहळा ऑनलाइन बघितला. विवेकानंद आश्रमाच्या अधिकृत यू-ट्यूब, फेसबुकवर एकाचवेळी लाइव्ह प्रक्षेपण करण्यात आले. वर्षभरात विवेकानंद आश्रमात संपन्न होणारे विविध धार्मिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक कार्यक्रम नियमितपणे ऑनलाइन पार पडत असतात. विवेकानंद जन्मोत्सवाच्या तीनदिवसीय कार्यक्रमांचे ऑनलाइन प्रसारण करण्यात आले होते.