लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा : तालुक्यातील मोहाडी येथे निवडणुकीत मतदान कोणाला केले या कारणावरून दोन गटात वाद होऊन गुरूवारी सकाळी किरकोळ तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत वातावरण निवळवले. ग्राम पंचायतीची निवडणूक शांततेत पार पडली. परंतु मतमोजणी नंतर कोणी कुणाला मतदान केले. यावरुन आपसात बोलाचाली होवून त्याचे रुपांतर तणावात झाले. दोन्ही बाजूंनी लोक जमा झाल्याने पोलिसांनी हस्तक्षेप केला.२७ डिसेंबरला मतमोजणी झाली. त्यात अशोक रिंढे विजयी झाले. त्यांच्या गटाचे चार सदस्य निवडून आल्याने त्यांना बहुमत मिळाले. सर्व काही शांततेत पार पडल्यानंतर परमानंद गुलाबराव रिंढे हे शेतात जात असतांना बेबीबाई समाधान इंगळे यांच्यात शाब्दीक बोलाचाली झाली. शेतीच्या धुर्याचा वाद निवडणूक फडात आल्याने दोन्ही गटातील लोक आमने सामने उभे ठाकले वाद विकोपाला जावूनये म्हणून साखरखेर्डा पोलिस स्टेशनचे ठाणेदार सचिन शिंदे घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही गटातील लोकांना समजावून सांगून तनाव निवळला. त्यानंतर बेबीबाई समाधान इंगळे यांच्या तक्रारीवरुन साखरखेर्डा पोलिसांनी परमानंद रिंढे यांच्यासह तिघांवर प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई केली आहे.
सिंदखेडराजा तालुका : निवडणुकीच्या कारणावरून मोहाडीत किरकोळ तणाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 12:37 AM
सिंदखेडराजा : तालुक्यातील मोहाडी येथे निवडणुकीत मतदान कोणाला केले या कारणावरून दोन गटात वाद होऊन गुरूवारी सकाळी किरकोळ तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत वातावरण निवळवले.
ठळक मुद्देनिवडणुकीत मतदान कोणाला केले या कारणावरून दोन गटात वाद पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने वातावरण निवळवले