लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेड राजा: राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेबांच्या जन्मोत्सवासाठी सिंदखेड राजा नगरी सज्ज झाली असून जिजाऊ सृष्टीवर त्यानुषंगाने जय्यत तयारी करण्यात आली आहे. १२ जानेवारी रोजीच युवराज छञपती संभाजी राजे भोसले यांना मराठा विश्वभुषण पुरस्कार तर बबीता ताडे यांना जिजाऊ पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात येणार आहे.जन्मोत्सवानिमित्त भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून येथे सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. लाखोंच्या संख्येने होणारी गर्दी पाहता येथे वाहनतळ, दुकाने, उपहारगृह, प्रकाश व्यवस्था आणि जिजाऊ सृष्टीवर रंगरंगोटी करण्यात आली आहे. १२ जानेवारी रोजी जिजाऊ जन्मोत्सव स्थळी मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी सुर्याेदयी जिजाऊ पुजन करून जिजाऊ सृष्टीवर पोहोचतील. या सोहळ््यासाठी राज्यासह परदेशातून भाविक मातृतिर्थ सिंदखेड राजा येथे येत असतात. यंदाचा हा ४२२ वा जन्मोत्सव सोहळा आहे. आयोजन समितीच्यावतीने सोहळ््याच्या दृष्टीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. येथे ४०० पेक्षा अधिक बुक स्टॉलही उभारण्यात आले आहेत.
जिजाऊ जन्मोत्वासाठी सिंदखेड राजा नगरी झाली सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 14:04 IST
यंदाचा हा ४२२ वा जन्मोत्सव सोहळा आहे. आयोजन समितीच्यावतीने सोहळ््याच्या दृष्टीने जय्यत तयारी करण्यात आली आहे.
जिजाऊ जन्मोत्वासाठी सिंदखेड राजा नगरी झाली सज्ज
ठळक मुद्देराज्यासह परदेशातून भाविक मातृतिर्थ सिंदखेड राजा येथे येत असतात. सकाळी नऊ वाजता जिजाऊसृष्टीवर ध्वजवंदन होईल. मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर यांचे समारोपीय मार्गदर्शन होईल.