लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा : साखरखेर्डासह परिसरात यावर्षी पावसाचे अत्यल्प प्रमाण राहिल्याने तलाव कोरडेच असून विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे जवळपास १५ गावात पाण्याची भिषण टंचाई निर्माण झाली आहे. विहिर अधिग्रहणासह टँकरचे प्रस्ताव ग्राम पंचायतीनी सादर केले असून यावर अद्याप कोणताही ठोस निर्णय प्रशासनाने घेतला नाही. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. कोराडी प्रकल्प ते गावापर्यंत नविन पाईप टाकावे, यासाठी ग्राम पंचायतीने पाणी पुरवठामंत्री ना.बबनराव लोणीकर यांना आ.डॉ.शशिकांत खेडेकर यांच्या मार्फत प्रस्ताव सादर केला आहे. साखरखेर्डा येथे महालक्ष्मी तलावावरुन पाणी पुरवठा केल्या जातो. त्याच प्रमाणे कोराडी प्रकल्पावरुन सुध्दा पाणी पुरवठा होतो. यावर्षी पाऊस अत्यल्प झाल्याने महालक्ष्मी तलावात जेमतेम २५ टक्के पाणीसाठा जमा झाला. नोव्हेंबर महिन्यात तलावात मृत साठ्यापेक्षा कमी पाणी असल्याने गावाला पाणी पुरवठा करणे कठीण झाले आहे. कोराडी प्रकल्पावरुन पाणी पुरवठा करण्यासाठी ग्राम पंचायतीसाठी किरकोळ दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. परंतु पाईप लाईन ही निकृष्ट दर्जाची असल्याने गावापर्यंत पाणी पोहचण्यासाठी खुपच प्रयत्न करावे लागणार आहे. कोराडी प्रकल्प ते गावापर्यंत नविन पाईप टाकावे, यासाठी ग्राम पंचायतीने पाणी पुरवठामंत्री ना.बबनराव लोणीकर यांना आ.डॉ.शशिकांत खेडेकर यांच्या मार्फत प्रस्ताव सादर केला आहे. पिंपळगांव सोनारा येथेही यावर्षी भिषण पाणी टंचाई निर्माण झाली असून, महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. येथील नळयोजनेला किमान ४० वर्ष पूर्ण झाले असून पाणी पुरवठा विहिरीत पाणी नाही जवळपास एकही तलाव नाही. त्यामुळे या गावाला टँकरने पाणी पुरवठा करावा, असा प्रस्ताव सरपंच तोताराम ठोसरे यांनी तहसिलदार आणि पंचायत समितीकडे पाठविला आहे. त्याच बरोबर गावात नविन नळयोजना प्रस्तावित करुन पाणी पुरवठा सुरळीत कसा होईल यासाठी प्रस्ताव आ.डॉ.शशिकांत खेडेकर यांचेकडे सादर केला आहे. या गावात आहे पाणी समस्यासिंदखेडराजा तालुक्यातील गोरेगाव, शिंदी, राताळी, उमनगाव, दरेगाव, मोहाडी, तांदुळवाडी, काटेपांग्री, सावंगीभगत या गावातही पाणी टंचाई निर्माण झाली आहे. काही गावात टँकरची मागणी करण्यात आली असून विहिर अधिग्रहणाचे प्रस्तावही पाठविले आहेत. प्रशासन यावर काय निर्णय घेते याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागून आहे.
सिंदखेडराजा तालुक्यात विहिरींनी तळ गाठला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 7:14 PM
साखरखेर्डासह परिसरात यावर्षी पावसाचे अत्यल्प प्रमाण राहिल्याने तलाव कोरडेच असून विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे जवळपास १५ गावात पाण्याची भिषण टंचाई निर्माण झाली आहे.
ठळक मुद्देसाखरखेर्डासह अनेक गावात पाणी टंचाई पाईप लाईनसाठी पाणी पुरवठा मंत्र्यांकडे प्रस्ताव