शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
2
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
3
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
4
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
5
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
6
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
7
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
8
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
9
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक
10
...तर ५० उमेदवार उभे केले असते, समाजाचे योगदान वाया जाऊ देणार नाही; मनोज जरांगेंचे सूचक भाष्य
11
शिवसेना ही बाळासाहेबांची मालमत्ता खरे आहे, पण..; दीपक केसरकरांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर 
12
Maharashtra Election 2024: सरकार आल्यास मविआ कोणासाठी काय करणार? ठाकरेंनी सांगून टाकलं
13
Eknath Shinde : "....मी एकदा नाही तर १० वेळा जेलमध्ये जायला तयार"; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना ठणकावलं
14
लोकसभा निवडणुकीत भुजबळांकडून राजाभाऊ वाजेंना मदत?; हेमंत गोडसेंनी शिवसैनिकांसमोर केला गंभीर आरोप!
15
सुशांतची आत्महत्या नाही तर हत्या! सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचा खळबळजनक दावा, म्हणते, डॉक्टरांनी बदलले पोस्टमोर्टम रिपोर्ट
16
“जयश्री पाटील या महाविकास आघाडीच्या उमेदवार, यांनाच निवडून द्या”; विशाल पाटील यांचे आवाहन
17
ऐन विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या ५ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
18
उमेदवार अर्ज मागे घेण्यासाठी पोहोचला, पण...; अवघ्या १५ सेकंदात घडल्या नाट्यमय राजकीय घडामोडी!
19
मानखुर्दमध्ये अबु आझमींची ठाकरे गटाच्या शाखेला भेट; ठाकरेंचे शिवसैनिक करणार प्रचार
20
Parliament Winter Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन २५ नोव्हेंबर ते २० डिसेंबर पर्यंत चालणार; केंद्रीय मंत्र्यांनी माहिती दिली

सिंदखेडराजा : चारित्र्याच्या संशयावरुन शिक्षकाने केला पत्नीचा खून!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 2:15 AM

सिंदखेडराजा: येथील एका शिक्षकाने चारित्र्याच्या संशयावरून वर्षभरापासून विभक्त राहत असलेल्या शिक्षक पत्नीचा धारदार चाकूने गळा चिरून खून केल्याची घटना १0 डिसेंबर रोजी रात्री घडली. या प्रकरणी मृतक शिक्षिकेच्या भावाने सिंदखेड राजा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

ठळक मुद्देघटस्फोटासाठी दारव्हा न्यायालयात पत्नीचा होता अर्ज

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा: येथील एका शिक्षकाने चारित्र्याच्या संशयावरून वर्षभरापासून विभक्त राहत असलेल्या शिक्षक पत्नीचा धारदार चाकूने गळा चिरून खून केल्याची घटना १0 डिसेंबर रोजी रात्री घडली. या प्रकरणी मृतक शिक्षिकेच्या भावाने सिंदखेड राजा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.सुलभा सरोदे असे मृतक महिलेचे नाव आहे. यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा येथील रहिवासी सुलभा हिचे लग्न सिंदखेड राजा येथील प्रफुल्ल प्रभाकर सरोदे याच्यासोबत १३ वर्षांंपूर्वी झाले होते. सुलभा ही सिंदखेड राजा नगर परिषद मराठी प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होती, तर प्रफुल्ल सरोदे हा उगला येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होता. दरम्यान, १२ वर्ष सुरळीत संसारात त्यांना दोन मुले झाली; परंतु प्रफुल्ल सरोदे हा गेल्या एक वर्षापासून पत्नीवर संशय घेत होता. त्यामुळे त्यांच्यात नेहमीच भांडणे होत असल्यामुळे सुलभाने सिंदखेड राजा येथे भावाच्याच घराशेजारी पतीपासून वेगळे राहण्याचा निर्णय घेतला होता. तिचा भाऊ वीज वितरण कंपनीत कार्यरत आहे. १0 डिसेंबर रोजी दुपारपासून नशेत असलेल्या प्रफुल्लने रात्री पत्नीच्या घरी जाऊन तिचा गळा चिरून खून केल्याचे मृतकाचा भाऊ धनंजय  लंभाटे यांनी सांगितले.धनंजय वसंतराव लंभाटे यांनीच पोलिसांत या प्रकरणी तक्रार दिली.  घटनेची माहिती कळताच ठाणेदार बळीराम गीते व त्यांचे सहकारी सहायक पोलीस उपनिरीक्षक नेमणार व अन्य पोलीस कर्मचारी लगोलग घटनास्थळी पोहोचले. रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास ही घटना घडल्याचे मृत सुलभाचा भाऊ धनंजय लंभाटे यांनी सांगितले. घटनेनंतर मृत सुलभाचा पती तेथून फरार झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. वृत्त लिहीपर्यंत पोलिसात प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.  दरम्यान, प्रफुल्ल सरोदे हा सुलभाच्या घरी गेला तेव्हा नशेत होता, असे पोलीस सूत्रांनी सांगितले. या घटनेची वार्ता गावात पसरताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा केला.दरम्यान, चार महिन्यांपूर्वी मृतक सुलभाने प्रफुल्ल सरोदेपासून फारकती घेण्यासाठी दारव्हा कोर्टात अर्ज केला होता. सुलभाचा खून झाला तेव्हा त्यांची दोन्ही मुले ही आजी- आजोबाकडे होती तर खून केल्यानंतर प्रफुल्ल सरोदे घटनास्थळावरून फरार झाल्याचे पीएसआय संतोष नेमणार यांनी सांगितले. 

टॅग्स :Crimeगुन्हाbuldhanaबुलडाणाsindhaked raja rajwadaसिंदखेडराजा राजवाडा