लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा: तालुक्यामध्ये ३0 ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेण्यात आल्या. जनतेमधून ३0 सरपंच पदासाठी व २५६ ग्राम पंचायत सदस्यांसाठी उमेदवारी अर्ज भरण्यात आल्यानंतर झोटिंगा ग्रामपंचायतचे सरपंच व सदस्य अविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली. तर २५६ सदस्यांपैकी ६७ सदस्यांची अविरोध निवड झाली. त्यामुळे २९ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी व १८९ सदस्यासाठी निवडणूक घेण्यात आली. ग्रामपंचायत निवडणुकीचे ९ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर करण्यात आले असून, सर्व प्रक्रिया शांततेने पार पडली. निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार संतोष कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निवडणूक नायब तहसीलदार सारिका भगत यांच्या नियंत्रणामध्ये दहा निवडणूक निर्णय अधिकारी नेमण्यात आले होते. प्रत्येक अधिकार्याकडे तीन ग्रामपंचाय तच्या निवडणूक प्रक्रियेची जबाबदारी देण्यात आली होती. निवडणूक निर्णय अधिकारी तथा नायब तहसीलदार एच.डी. वीर, प्रीती जाधव, अस्मा मुजावर तसेच महसूल कर्मचारी, पा पुलवार, धोंडारकर, गीते, बंगाळे, कर्हाळे, गादेवाड, कुळकर्णी यांच्यासह सर्व कर्मचार्यांनी निवडणूक प्रक्रिया शांततेने पार पाडली. ९ ऑक्टोबर रोजी निकाल ऐकण्यासाठी सिंदखेड राजा येथे नागरिकांची मोठय़ा प्रमाणावर गर्दी केली होती. यामध्ये ३0 ग्रामपंचायतचे सरपंच जाहीर होताच विजयी उमेदवारांनी गुलालाची उधळण करून वाजतगाजत जल्लोष करण्यात आला. पोलीस निरीक्षक बळीराम गीते, सहायक ठाणेदार संतोष नेमणार, सहायक ठाणेदार शिवाजी शिंगणवाड व उपनिरीक्षक ८ अधिकार्यांसह १0४ पोलीस कर्मचारी ६६ होमगार्ड व १ एसआरपी रेक्शन, उपविभागीय पोलीस अधिकारी भिमानंद नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली तगडा बंदोबस्त होता.
सिंदखेडराजा : २५६ सदस्यांपैकी ६७ सदस्य अविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 12:25 AM
सिंदखेडराजा: तालुक्यामध्ये ३0 ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेण्यात आल्या. जनतेमधून ३0 सरपंच पदासाठी व २५६ ग्राम पंचायत सदस्यांसाठी उमेदवारी अर्ज भरण्यात आल्यानंतर झोटिंगा ग्रामपंचायतचे सरपंच व सदस्य अविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली. तर २५६ सदस्यांपैकी ६७ सदस्यांची अविरोध निवड झाली. त्यामुळे २९ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी व १८९ सदस्यासाठी निवडणूक घेण्यात आली.
ठळक मुद्देतालुक्यातील ३0 पैकी २९ ग्रामपंचायतींसाठी पार पडली निवडणूकझोटिंग ग्राम पंचायत निवडणुकीपूर्वीच अविरोध