शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
2
Fact Check: मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल;  'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
3
“माझा मुलगा युद्धात लढून जिंकेल याचा अभिमान, अमितचा मोठा विजय हवा आहे”: शर्मिला ठाकरे
4
रोहित नसताना जसप्रीत बुमराहच कर्णधार! मॉर्कलच्या प्रेस कॉन्फरन्समुळे चर्चांना पूर्णविराम
5
Video - "मीरापूरमध्ये रिव्हॉल्व्हर दाखवून SHO ने मतदारांना धमकावलं"; अखिलेश यादवांचा आरोप
6
पाकिस्तानमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला; चौकी उडविली, १७ सैनिकांचा मृत्यू
7
निवडणुकीचे टेन्शन...! उमेदवाराने मतदान केंद्रावर प्राण सोडला; बीडमधील घटना
8
मणिपूरमधील उग्रवाद्यांविरुद्ध सरकार काय कारवाई करणार? मुख्यमंत्री बिरेन सिंह यांचा खुलासा
9
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्राचा एक्झिट पोल येण्यास सुरुवात; मॅट्रिक्स, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
10
“‘तो’ आवाज माझा नाही, भाजपाकडून खोडसाळपणा”; बिटकॉइन स्कॅमचे आरोप नाना पटोलेंनी फेटाळले
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
12
बिटकॉइन प्रकरण : "त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंचाच”; अजित पवार स्पष्टच बोलले 
13
VIDEO : परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला मुंडे समर्थकांची मारहाण; राष्ट्रवादीकडून निषेध...
14
घसरणीचा झुनझुनवाला कुटुंबालाही फटका; २ महिन्यात १५००० कोटी गमावले; हा शेअर सर्वात जास्त पडला
15
“पराभव निश्चित असल्याने भाजपाकडून सुप्रिया सुळे, नाना पटोलेंवर आरोप”: बाळासाहेब थोरात
16
वर्ध्यात कराळे मास्तरांना भररस्त्यात मारहाण; भाजप कार्यकर्त्याने हल्ला केल्याचा दावा
17
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
18
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं
19
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
20
५५ सेकंदाचा Video, ६ पानांची चिठ्ठी...; गर्लफ्रेंड करायची ब्लॅकमेल, तरुणाने उचललं 'हे' पाऊल

मुख्याधिकाऱ्यांकडून खामगाव शहरातील विविध प्रभागाचे स्थळ निरिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 11:58 AM

ठराविक वेळेत आणि एक मीटर अंतरावरूनच ग्राहकांना भाजी खरेदी करावी लागणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना म्हणून खामगाव शहरात आता भाजी विक्रीसाठी १०० तर फळ विक्रीसाठी २५ दुकानांसाठी जागा निश्चित करण्यात आली आहे. शहरातील प्रत्येक प्रभागात भाजीची ५ दुकाने राहतील. उर्वरीत २० दुकाने मुख्य रस्त्यावर राहणार आहे. त्यामुळे आता ठराविक वेळेत आणि एक मीटर अंतरावरूनच ग्राहकांना भाजी खरेदी करावी लागणार आहे.कोरोना या विषाणूजन्य आजाराने देशभर कहर माजविला आहे. कोरोनाच्या विषाणूने महाराष्ट्रात संचार वाढविल्याने केंद्र आणि राज्य शासनाकडून २३ मार्चपासून सर्वच शहरे लॉकडाऊन करण्यात आलीत. यामध्ये खामगाव शहराचाही समावेश असून शहरातील भाजी बाजार बंद करण्यात आला. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहकांची एकच गर्दी होत असल्याचे निदर्शनास येतात नगर पालिका आणि पोलिस प्रशासनाकडून चुन्याचे रकाने आखण्यात आलेत. ठराविक वेळेत भाजी खरेदीची मुभाही दिली आहे. मात्र, भाजीपाला किराणा आणि औषधी खरेदी करण्यासाठी गर्दी होत आहे.प्रामुख्याने भाजीपाल्याच्या दुकानावर झुंबड उडत असल्याचे निर्दशनास येताच, गर्दी नियत्रंणासाठी उपाययोजना म्हणून प्रत्येक प्रभागात भाजीची ५ दुकाने सकाळी ७ ते १२ या वेळेत सुरू रहाणार आहेत. त्याचप्रमाणे मुख्य रस्त्यावरही ठराविक अंतराने ही दुकाने राहणार आहे.नगर पालिका प्रशासनाची बैठक!शहरातील गर्दी नियंत्रित करण्यासाठी नगर पालिका प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहे. मात्र, जीवनावश्यक वस्तूंच्या दुकांनावरील गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना म्हणून नगर पालिका मुख्याधिकारी धनंजय बोरीकर, उपमुख्याधिकारी रविंद्र सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत आरोग्य, अग्निशमन आणि आपातकालीन विभागाची बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर मुख्याधिकाऱ्यांनी विविध विभागप्रमुखासह शहरातील विविध प्रभागांचे स्थळ निरिक्षण केले. त्यानंतर या ठिकाणी दुकानांसाठी चुन्याचे रकाने आखण्यात आले.

भाजी दुकानांवर होत असलेली गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना म्हणून प्रभागनिहाय दुकानांसाठी स्थळ निश्चिती करण्यात आली आहे. त्यानुसार शहरात भाजीची १०० तर फळांसाठी २५ दुकाने राहतील. आपातकालीन परिस्थितीत नागरिकांनी सहकार्य करावे.- धनंजय बोरीकरमुख्याधिकारी, नगर परिषद, खामगाव.

टॅग्स :khamgaonखामगावCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस