लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत देण्यात आलेल्या कामात कसूर करण्यात आल्याचे स्पष्ट झाल्याने, नगरपालिकेतील सहा अधिकारी, कर्मचाºयांना मुख्याधिकाºयांनी कारणे दाखवा नोटिस बजावली आहे.स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी ४७ जणांचे पथक कार्यान्वित करण्यात आले असून, खामगाव पालिकेत कक्षही स्थापन करण्यात आला आहे. दरम्यान, विभागनिहाय वेगवेगळ्या कर्मचाºयांकडे जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये ४० अधिकारी कर्मचाºयांचा समावेश असून, १३ पैकी बहुतांश ठिकाणी असलेली उघड्यावरील हगणदरी नियंत्रणात आली आहे; मात्र अशाही परिस्थितीत काही कर्मचाºयांकडून आपल्या कर्तव्यात कसूर केले जात असल्याचे दिसून येते. सोमवारी आरोग्य विभागाची तसेच स्वच्छता पथकाची बैठक बोलाविण्यात आली. आढावा घेतल्यानं तर बोरीकर यांनी कारणे दाखवा नोटिस बजावली.
सहा कर्मचा-यांना कारणे दाखवा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 9:56 PM