शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

कोरोनामुळे सहा जणांचा मृत्यू; २४ तासांत १२८५ जण पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 11:59 AM

Corona Cases in Buldhana : शनिवारी पुन्हा १२८५ जण तपासणीत कोरोनाबाधित निघाले. दरम्यान, सहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कोरोना प्रतिबंधासाठी लावण्यात  आलेले कडक निर्बंध आणि संचारबंदीच्या तीन दिवसांनंतरही जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण वाढत असून शुक्रवारच्या ११४० विक्रमी पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येनंतर शनिवारी पुन्हा १२८५ जण तपासणीत कोरोनाबाधित निघाले. दरम्यान, सहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. परिणामी, जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या आता ३२८ झाली आहे.प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी ६८०३ जणांचे अहवाल शनिवारी प्राप्त झाले. त्यांपैकी ५,५१८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये एकट्या बुलडाणा तालुक्यात २५९, खामगावमध्ये ७६, शेगावमध्ये ५०, देऊळगाव राजात ६०, चिखलीत १२८, मेहकरमध्ये २०४, मलकापूरमध्ये ५१, नांदुऱ्यात ८७, लोणारमध्ये १०१, मोताळ्यात ११५, जळगाव जामोदमध्ये ६८, सिंदखेड राजामध्ये ८५ आणि संग्रामपूर तालुक्यात १ याप्रमाणे १२८५ जण कोरोनाबाधित आढळून आले.सरीकडे बुलडाणा शहरातील जुनागाव येथील ५८ वर्षीय व्यक्ती आणि शहरातील ६५ वर्षीय महिला, साखरखेर्डा येथील ६५ वर्षीय महिला, मोताळा तालुक्यातील जयपूर येथील ५४ वर्षीय महिला, खामगाव तालुक्यातील टेंभुर्णा येथील ६९ वर्षीय पुरुष तसेच लोणार तालुक्यातील गायखेड येथील ८५ वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या दोन दिवसांत जिल्ह्यात दहाजणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.दरम्यान, शनिवारी ६८६ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. अद्यापही ४ हजार १३५ जणांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४४ हजार ३७९ जणांनी कोरोनावर मात केली आहे; तर २ लाख ९६ हजार २१ संदिग्धांचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत. सलग दोन दिवस विक्रमी कोरोना बाधित जिल्ह्यात आढळून आले आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या