बुलडाणा : बंगळुरू येथील वेल्लमा शहरानजीक कंटेनर-कारच्या धडकेत कारचालकासह सात जण ठार झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. अपघातात भुसावळ डीआरएम कार्यालयातील कंट्रोल रूममध्ये कार्यरत रेल्वे सुरक्षा दलाचे हवालदार मिलिंद देशमुख यांच्या कुटुंबातील सहा जणांचा मृतांमध्ये समावेशआहे. ते बंगळुरू येथे फिरायला गेले होते.मिलिंद यांचा लहान भाऊ राजेश बंगळुरू येथे खासगी कंपनीत नोकरीला आहे. मुलांसोबत ते आपल्या लहान भावाकडे गेले होते. देशमुख कुटुंबीय दुपारी १ वाजता कारने फिरायला जात होते. त्यांच्या कारला वेल्लूर जिल्ह्यातील वेलम्माजवळ अपघात झाला. यामध्ये मिलिंद नारायण देशमुख (४५), त्यांची पत्नी किरण (३५), मुलगा आदित्य (१२) व अजिंक्य (७) यांच्यासह राजेश नारायण देशमुख (३७), पत्नी सारिका (३१) अशा सहा जणांसह चालक जागेवर ठार झाले.अपघाताची माहिती पोलिसांकडून त्यांचे भाऊ आनंद देशमुख यांना मिळाली. आनंद देशमुख हे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांचे अंगरक्षक म्हणून कार्यरत आहेत. मंगळवारी संध्याकाळपर्यंत मृतदेह अंत्यविधीसाठी खामगाव येथे आणण्यात येणार असल्याची माहिती नातेवाइकांनी दिली.
अपघातात रेल्वे पोलिसासह कुटुंबातील सहा जण ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2019 6:04 AM