तालुक्यातील खस्ता हालतीत असलेल्या रस्त्यांबाबत राहुल बोंद्रे यांनी ना.चव्हाण यांची भेट घेऊन निवेदन सादर केले होते. याची दखल घेत सहा रस्त्यांना प्लॅनमध्ये दर्जोन्नती करण्याबाबतचे आदेश ना.चव्हाण यांनी दिले आहेत. यामध्ये धोडप-चांधई रस्ता, सोनेवाडी-सावरगांव डुकरे रस्ता, दिवठाणा ते उतरादा पेठ नवीन गावठाण रस्ता, गोकुळ नगर नवीन गावठाण ते उत्रादापेठा रस्ता, बारेवाडी ते चांधई रस्ता, भोकर ते कोळेगांव जिल्हा सीमेपर्यंतचा रस्ता, पळसखेड दौलत ते येवता रस्ता प्रजिमा ३४ ला जोडणारा ग्रामीण मार्ग ८१ ची वाढीव लांबीसह एकूण १६ कि.मी.च्या रस्त्यांचे दर्जोन्नती करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. चव्हाण यांनी दिले असल्याची माहिती आहे. यावेळी सरपंच रमेश इंगळे, रवि इंगळे, शिवसिंग इंगळे, नारायण इंगळे, विलास इंगळे, रामेश्वर इंगळे, पंढरी इंगळे, पवन इंगळे उपस्थित होते.
चिखली तालुक्यातील सहा रस्त्यांची दर्जोन्नती होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 4:37 AM