- अनिल गवई
खामगाव: आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांचे घरकुलांचे स्वप्नं साकार करण्यासाठी जिल्ह्यातील पालिका प्रशासन कामाला लागले आहे. खामगावातील १४०० घरकुलांचा डीपीआर (प्रकल्प अहवाल) जिल्हाधिकाºयांकडे सादर केला असून, आणखी सहाशे घरांचा डीपीआर तयार झाला आहे. या योजनेतंर्गत खामगावात सर्वाधिक ६ हजार ४३६ लाभार्थ्यांनी अर्ज सादर केलेत.
‘सर्वांसाठी घरे’ हे ब्रिद असलेल्या पंतप्रधान आवास योजनेचा शुभारंभ २५ जून २०१५ रोजी करण्यात आला. आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटासाठी असलेल्या लाभार्थ्यांसाठी चार भागांची वेगळी योजना असे या योजनेचे खास वैशिष्टे असून खामगाव शहरात २०१७- २०२२ पर्यंत ३५१९ घरकुलांचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. खामगाव शहरातील घरकुलांच्या उभारणीसाठी मुंबई येथील देवधर असोसिएटस्ची प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्याअनुषंगाने या संस्थेने खामगावातील विविध भागाचे सर्वेक्षण करून सहा हजार ४३६ लाभार्थ्यांचे अर्ज भरून घेतलेत. यापैकी तब्बल दोन हजारावर लाभार्थ्यांच्या अर्जातील त्रृटीपूर्ण करण्यात आल्या. उर्वरीत लाभार्थ्यांच्या त्रृटींची पूर्तता करतानाच, टप्प्या-टप्प्याने घरकुलांचा डीपीआर पुढील मान्यतेसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे पालिका प्रशासन सादर करीत आहे.
वर्गवारी निहाय घरकुलांसाठी प्राप्त अर्जांची आकडेवारी (खामगाव शहर)
आहे तेथेच घरकुल(स्लम रिडेव्हलेपमेंट) ३,९७०
भागीदारीतील घरे (एएचपी) १,२७१
स्वत:च्या घरात वाढीव काम(बीएलसी) १,१९५
एकुण प्राप्त अर्ज- ६, ४३६
जिल्ह्यातील तालुका निहाय घरकुल बांधकामाचे उद्दीष्ट(सन २०२२ पर्यंत)
तालुका घरकुल
बुलडाणा २७८३
खामगाव ३५१९
चिखली २३४१
मलकापूर २६७१
मेहकर १६४२
नांदुरा १६१२
शेगाव २१६६
जळगाव जामोद १०२६
देऊळगाव राजा १११९
सिंदखेडराजा ०५९६
लोणार ०८५०
मोताळा ०३७५
संग्रामपूर ०२७०