शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

तर जगातील 25 टक्के लोकसंख्या मानसिक विकारात, सेल्फायटीस, फेसबुक अ‍ॅडिक्शन हे आजारच!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2018 10:14 PM

क्रुझमधील सुरक्षा रेलींग ओलांडून मिसेस मुख्यमंत्री फडणवीस यांनी सेल्फी काढल्याचा मुद्दा सोशल मिडियावर चांगलाच ट्रोल होत असतानाच सेल्फायटिस,

बुलडाणा: क्रुझमधील सुरक्षा रेलींग ओलांडून मिसेस मुख्यमंत्री फडणवीस यांनी सेल्फी काढल्याचा मुद्दा सोशल मिडियावर चांगलाच ट्रोल होत असतानाच सेल्फायटिस, फेसबुक अ‍ॅडिक्शन डिसऑर्डरसारखे आजार आता समोर येत आहेत. 2025 पर्यंत जगातील 25 टक्के लोकसंख्येला मानसिक आजार जडेल, असे महत्त्वपूर्ण भाकित आंतरराष्ट्रीय ख्यातीचे व्याख्याते तंत्रज्ञ, विज्ञान, संगणक आणि तंत्रज्ञान आणि व्यवसाय या विषयांवर विपूल लेखन करणारे अच्यूत गोडबोले यांनी बुलडाणा येथे केले.

बुलडाणा येथे 21 ऑक्टोबरला आयोजित करण्यात आलेल्या एका व्याख्यानाच्या निमित्ताने ते आले होते. त्यावेळी स्थानिक बुलडाणा अर्बन रेसीडेन्सीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. सोशल मिडियात वाढता सेल्फीट्रेन्ड, फेसबुक अ‍ॅडिक्ट आणि वतर्ममानस्थितीत भरकटलेला युवक या मुद्यांना धरून त्यांना विचारणा केली असता त्यांनी उपरोक्त विधान केले. वाढता चंगळवाद हा अनेक बाबींसाठी कारणीभूत असून भरकटलेला आजचा युवक, तरुण वर्ग हा आई-वडिलानी आपल्या पाल्यामध्ये मुल्यांची रुजवणूक करणे गरजेचे झाले आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. प्रसिद्धी आणि पैसा यामुळे आजची मुले भरकटू लागली असून दुसर्याशी तुलना केल्याने समस्या निर्माण होत आहे. आपण तंत्रज्ञानाच्या विरोधात नसून ते एक साधन म्हणून उपयुक्त आहे. पाश्चिमात्य संस्कृती आज आपण स्वीकारत आहोत. यूज आणि थ्रो ही संकल्पना आजच्या तरूण पिढीत रुजल्या गेल्याने समस्या निर्माण होत आहे. त्यातूनच 2025 पर्यंत जगातील 25 टक्के लोकसंख्या ही मानसिक विकारात राहील, असे वक्तव्य त्यांनी केले. दुसरीकडे दिवसातून किमान तीनदा डीपी बदलणेही मानसिक विकारात मोडते. त्यातून आता नव्याने सेल्फायटीस, फेसबुक अ‍ॅडिक्शन डिसऑर्डर सारखे आजार समोर येत आहेत. आज सोशल मिडीयाचा वापर थिल्लरपणे चालू आहे. वास्तविक सोशल मीडियाने अनेक चळवळी उभ्या केल्या. ‘मीटू’, जेष्ठ नागरिकांची चळवळ अशा अनेक चळवळी उभ्या राहल्या आहेत. ‘मीटू’ चे संदर्भ आणि अन्वयार्थ काहीसे वेगळे आहेत. मात्र, सोशल मिडीयामध्ये ताकद आहे. हे तंत्रज्ञान सकारात्मक दृष्टीकोणातून साधन म्हणून वापरणे योग्य आहे. परंतु, त्याच्या अधीन जाणे तितकेसे योग्य नाही, असेही अच्यूत गोडबोले म्हणाले.

‘ईव्हीएम हॅक होऊ शकते पण हियर नाही!’‘ईव्हीएम मशीन हॅक होऊ शकते पण ते हियर होईल की नाही याबाबत सांगता येणार नाही!’ असे वक्तव्य एका प्रश्नाला उत्तर देताना अच्यूत गोडबोले यांनी देऊन पत्रकार परिषदेत हशा पिकविला. लोकशाहीत जर अशा मुद्द्यावरून शंका निर्माण होत असले तर त्या ठिकाणी बॅलेटपेपरवच निवडणूक घेतली जावी. लोकशाहीचा खेळ कशाला. यामध्ये आपण सत्ताधारी पक्षाला दोष देत नाही. विरोधक त्या मुद्द्यावर बोंब मारताहेत. अशा मुद्द्यांशी आपल्याला घेणे नाही. तसेच मिळणारी मते ही एका विशिष्ट पक्षालाच मिळताहेत याबाबतही अपाण सांगू शकत नाही. मात्र जेथे शंका आहे तेथे कशाला खेळ, असे ते म्हणाले.

निश्चलीकरण योग्य पण घाईत घेतलेला निर्णयनोटबंदीचा( निश्चलीकरण) घेतलेला निर्णय अथवा कल्पना योग्य आहे. परंतू तो निर्णय घाईघाईत घेतला गेला. नोटांमध्ये 6.8 टक्के पैसा हा काळा पैसा आहे. बाकी काळा पैसा हा प्रॉपर्टी, सोने आणि परदेशात आहे. हजाराची नोट बंद करून दोन हजाराची काढणे तर्कसंगत वाटत नाही. त्यापेक्षा हजाराची नोट बंद करून त्याजागी तेवढ्याच मुल्ल्याच्या 500 रुपयांचा अतिरिक्त नोटा आणल्या गेल्या असत्या तर अधिक बरे झाले असते. एटीएममधील सॉफ्टवेअरमध्ये जुजबी बदल करून ते फिटअप करता आल्या असत्या. रांगेमध्येही त्यामुळे उभे राहण्याचे काम नव्हते, असेही गोडबोले म्हणाले.

टॅग्स :Selfieसेल्फीbuldhanaबुलडाणाAchyut Godboleअच्युत गोडबोलेDemonetisationनिश्चलनीकरण