जळगाव जामोद : लोकमतने आजतागायत अनेक सामाजिक उपक्रम राबवून आपली बांधिलकी समाजातील विविध घटकांशी आहे हे सिद्ध करून दाखविले.कोरोना महामारीच्या काळात रक्ताचा पडलेला तुटवडा भरून काढण्यासाठी लोकमत वृत्तपत्र समूहाने "लोकमत रक्ताचं नातं" हा उपक्रम राबवून गरजू रुग्णांना मोठा दिलासा दिला आहे,असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार डॉ.संजय कुटे यांनी केले. सेठ तुळशीरामजी ढोकणे कनिष्ठ महाविद्यालय आसलगाव येथे सोमवार १२ जुलै रोजी स्वातंत्र्यसेनानी जवाहरलालबाबूजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी उद् घाटक म्हणून माजी मंत्री आमदार डॉ.संजय कुटे बोलत होते. अध्यक्षस्थानी सातपुडा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आ.कृष्णराव इंगळे हे होते तर पणन महासंघाचे संचालक तथा राष्ट्रवादी काँग्रेस नेते अँड. प्रसेनजीत पाटील,महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष अँड.ज्योतीताई ढोकणे,सेनेचे तालुकाप्रमुख गजानन वाघ,राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अभियंता प्रकाशसेठ ढोकणे,आसलगावचे सरपंच सुनील डीवरे, उपसरपंच गणेश गिर्ह यांच्यासह माजी पंचायत समिती सदस्य सुनील येनकर,माजी सरकारी वकील अँड.बाळासाहेब खिरोडकर,प्राचार्या ज्योतीताई वनारे,उल्हास मोहोदे,गजानन सरोदे,रामा इंगळे अझहर देशमुख,नीलेश शर्मा,मुख्याध्यापक वामनराव फंड,विष्णू इंगळे,ज्ञानदेव गायकी यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. या शिबिरात सेठ तुळशीरामजी ढोकणे कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी,प्राचार्य व शिक्षक, लघुसिंचन विभाग,कृषी विभाग,पंचायत समिती, आसलगावचे नागरीक यांनी रक्तदान करून लोकमत रक्ताचं नातं या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला.यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला सहकारी पतसंस्थेने विशेष सहकार्य केले.प्रास्ताविक प्रा.नानासाहेब कांडलकर यांनी केले तर प्रा.अतुल उमाळे यांनी संचालन केले. प्राचार्या ज्योतीताई वानेरे यांनी आभार मानले.सेठ तुळशीरामजी ढोकणे कनिष्ठ महाविद्यालयाच्या चमूने विशेष परिश्रम घेतले.
रक्त संकलनाचा लोकमतने गाठला उच्चांक-कृष्णराव इंगळेसध्या महाराष्ट्राला रक्त साठ्याची गरज असतांना लोकमतने रक्तदान शिबिरे आयोजित करून रक्त संकलन केले व करीत आहे.त्यामुळे आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडीत निघून एक नवा उच्चांक प्रस्थापित होईल असा विश्वास माजी आमदार कृष्णराव इंगळे यांनी अध्यक्षपदावरून बोलताना व्यक्त केला.